Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
नैसर्गिक ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यासाठी वृक्ष लावा- सुरेश पाटील
सोलापूर- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक तीन चे नगरसेवक सुरेश पाटील त्यांच्या वतीने जोडभावी पेठ आणि भवानी पेठ या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, नगरसेविका अंबिका पाटील, विजयलक्ष्मी गड्डम, इंदिरा कुडक्याल, लक्ष्मीकांत गड्डम, आदि मान्यवरांच्या हस्ते भवानी पेठ आणि जोडभावी पेठ येथे वृक्षारोपण करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे प्रत्येक नागरिकांनी एक तरी झाड लावावे असे आवाहन मनपा आयुक्त शिवशंकर यांच्याकडून करण्यात आले. यावेळी बोलताना ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील म्हणाले की सध्या कोरोना महामारीचे काळ असल्यानं देशात, राज्यात व सोलापूर शहरात सुद्धा ऑक्सीजनची कमतरता भासत आहे. नैसर्गिक ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यासाठी तसेच वृक्ष लावणे, वृक्षाची संगोपन करणे हा काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
हे वाचा- महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात मान्सून दाखल होणार
यावेळी शहर उपाध्यक्ष प्रशांत फत्तेपुरकर चंद्रकांत तापडिया लक्ष्मीकांत गड्डम चंद्रकांत मुंडे मनोज पाटील आदींची उपस्थिती होती.
#solapurcitynews