vidhan sabha
Maharashtra

दिवंगत सदस्यांच्या कुटुंबियांकडे ‘स्मृतिपत्र’ प्रत्यक्ष देऊन सांत्वन करण्याची नवी परंपरा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- विधानसभा सदस्यांच्या निधनाबद्दल कुटुंबियांचे सांत्वन करताना पूर्वी विधानसभेत मंजूर झालेला शोकप्रस्ताव त्यांच्या घरी पाठवण्यात येत असे. यापुढे त्या शोकप्रस्तावासोबत त्यांच्या कार्याचा उल्लेख असणारे ‘स्मृतिपत्र’ संबंधित आमदार तसेच संबंधित प्रांत, तहसीलदार यांच्यामार्फत प्रत्यक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करुन सांत्वन केले जाईल. ही नवीन परंपरा यापुढे सुरू करण्यात यावी, असे निर्देश विधानसभेत मांडण्यात आलेला शोकप्रस्ताव मंजूर करताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

               मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या आजी माजी सदस्यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव सभागृहात मांडला. यात त्यांनी दिवंगत आमदार भारत भालके, माजी मंत्री विष्णू सवरा, माजी मंत्री प्रा. जावेद इक्बाल खान, माजी राज्यमंत्री विनायकराव पुंडलिकराव पाटील, माजी सदस्य तारासिंह नंदराजोग सरदार, अनंतराव आप्पाराव देवसरकर, नरसिंगराव घारफळकर, नारायण किसन पाटील, किसनराव माणिकराव खोपडे, सुरेश नामदेव गोरे आणि डॉ. जगन्नाथ सितारामजी ढोणे यांच्या सामाजिक, राजकीय कार्याला उजाळा दिला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी, आमदार सर्वश्री सुनिल भुसारा, अबु आझमी, कुणाल पाटील, यशवंत माने, जयकुमार रावल, संग्राम जगताप, संग्राम थोपटे, दिलीप माने, ॲड. आशिष शेलार, संजय केळकर, श्रीमती मनीषा चौधरी, किशोर जोरगेवार, मिहीर कोटेचा यांनी शोक प्रस्तावावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

                         दिवंगत भालके यांच्या सामाजिक तसेच सहकार चळवळीतील आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याचा गौरव यावेळी सर्व सदस्यांनी केला. दिवंगत सवरा यांच्या शांत, संयमी स्वभावाचा उल्लेख करत आदिवासी समाजाच्या विकासासाठी, शिक्षणासाठी तसेच कुपोषणमुक्तीसाठी त्यांनी केलेल्या कार्याला यावेळी उजाळा देण्यात आला. प्रा. जावेद इक्बाल खान यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा विशेष गौरव शोकप्रस्तावावर बोलताना सदस्यांनी केला. दिवंगत विनायकराव पाटील यांच्या कृषी, वन, सहकार क्षेत्रातील कार्याविषयी तसेच प्रयोगशील व्यक्तिमत्त्वाबाबतच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.

#solapurcitynews

जाहिरात–

126904272 1765867386911009 7423974680860265992 nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
📷 विवाह दिनांक – 27 डिसेंबर 2020
📷 स्थळ – हरिभाई देवकरण,प्रशाला प्रांगण , सोलापूर
सोलापूर येथे आयोजित केला आहे. तरी ईच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावा.
संपर्क – लोकमंगल फौंडेशन 13 अ , सह्याद्री नगर , विकास नगर ,जुना होटगी नाका , सोलापूर
नाव नोंदणी अंतिम तारीख –
20 डिसेंबर 2020
फोन नं – (0217) 232240
मो – 9657709710
Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com