Omicron cases
Covid 19 Health

Omicron cases: धोका वाढला! पिंपरी-चिंचवडमध्ये 2 लहान मुलींना ओमिक्रॉनची लागण, आरोग्य विभागाचे धाबे दणाणले

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

पिंपरी-चिंचवड Omicron cases – पिंपरी-चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एकाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 8 झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन लहान मुलींनाही ओमिक्रॉनची लागण झाल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. या रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसत नसतानाही त्यांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं निदान झाल्यानं आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

        Omicron cases  पिंपरी-चिंचवडमध्ये सापडलेले सहाही जण नायजेरियातून आले होते. 24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी एक 44 वर्षाची महिला आली होती. तिच्या सोबत तिच्या दोन मुलीही होत्या. पिंपरी चिंचवडमध्ये राहणारा तिचा भाऊ, ती आणि तिच्या दोन्ही मुलींसह एकूण सहा जणांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल आला असून त्यात या सहाही जणांना लागण झाल्याचं आढळून आलं आहे. तसेच पुण्यातील एका 47 वर्षीय व्यक्तीलाही ओमिक्रॉनची लागण झाली आहे.

छोट्या मोठ्या उद्योगांना आर्थिक फटका बसणार म्हणून ग्रीनफील्ड महामार्गास व्यापाऱ्यांचा विरोध

तिघांमुळे आणखी तिघांना लागण

लेगॉसवरून आलेल्या या महिला आणि तिच्या दोन मुलींमुळे पिंपरीत राहणाऱ्या तिच्या भावासह घरातील आणखी दोघांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. पिंपरीचिंचवडमधील तिघेजण संपर्कात आल्याने त्यांना लागण झाली आहे. त्यामुळे हे सहाहीजण 24 नोव्हेंबरपासून ज्यांच्या जांच्या संपर्कात आले, त्या सर्वांची यादी तयार केली जात असून त्या सर्वांची चाचणी केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

चार मुली बाधित

नायजेरियाहून आलेली ही महिला 44 वर्षाची आहे. तिच्या दोन्ही मुलींपैकी एक मुलगी 12 आणि दुसरी 18 वर्षाची आहे. दोघींनाही ओमिक्रॉनची Omicron cases लागण झाली आहे. या तिघींच्या संपर्कात आलेल्या 13 जणांची तपासणी करण्यात आली. त्यात या महिलेचा 45 वर्षाचा भाऊ आणि त्याच्या दीड आणि 7 वर्षाच्या दोन मुलींनाही कोविड बाधित झाल्या. नंतर त्यांनाही ओमिक्रॉनची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. नायजेरियाहून आलेल्या या महिलेची अत्यंत सौम्य आहेत. तर इतर पाच जणांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळेही आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले आहे.

तिघांनी लस घेतलेलीच नव्हती

या 6 जणांपैकी तिघेजण 18 वर्षाखालील आहेत. त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही. तर तिघांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. दोघांनी कोविशिल्ड तर एकाने कोव्हॅक्सिनचे डोस घेतले होते. तरीही त्यांना ओमिक्रॉन झाल्याने चिंता वाढली आहे. पुण्यात एका तरुणाला ओमिक्रॉन झाल्याचं आढळून आलं आहे. तो 18 ते 25 नोव्हेंबर रोजी फिनलंडला जाऊन आला होता. 29 तारखेला त्याला ताप आला होता. त्यानंतर त्याची चाचणी केली असता त्याला कोविडची लागण झाल्याचं दिसून आलं. त्याने कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतले होते. नंतर त्याची तपासणी केली असता त्याला ओमिक्रॉनची Omicron cases लागण झाल्याचं निदान झालं. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews