Maharashtra निधन वार्ता

विजेच्या धक्क्यामुळे विहरीत कोसळून एकाचा मृत्यू

पुणे- जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील वैद वस्ती परिसरात विजेचा धक्का लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कर्ता व्यक्ती गेल्याने त्यांच्या कुटुंबावर जणू आभाळ कोसळले आहे. सुरेश सखाराम घाडगे (वय 40) विहिरीवरील पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेले असता विजेचा झटका बसला. विजेचा जोराचा धक्का बसल्याने ते थेट शेजारीच असलेल्या विहिरीत कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने वैद्य वस्ती परिसरात शोककळा पसरली आहे. आई-वडील वृद्ध असल्यामुळे रोज सकाळी मोटर सुरू करण्यासाठी ते स्वत: जात असत. परंतु, आज ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी व तीन भाऊ असा परिवार आहे.वैद वस्ती परिसरात निम्म्या घरांना ग्रामपंचायत नारायणगावचा पाणीपुरवठा होत नाही. आम्ही ग्रामपंचायत नारायणगावला या संदर्भात वेळोवेळी निवेदने दिली संपर्क केला. परंतु, त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही घटना घडली आहे, असा आरोप वैद वस्ती ग्रामस्थांनी केला आहे.

हे वाचा-

महाराष्ट्रात मृतांच्या संख्येने पुन्हा चिंता वाढवली

             संपूर्ण घटनेला ग्रामपंचायत नारायणगाव आणि सदस्य जबाबदार आहेत, अशी स्पष्ट टीका ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. तर या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य सारिका डेरे यांच्याशी संपर्क केला असता सदर ग्रामस्थांकडून माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाही आणि त्यांनी मला कुठलाही अर्ज दिला नाही, असे सांगून ग्रामस्थांचे आरोप फेटाळले आहेत. एकंदरच या संपूर्ण विषयात ग्रामपंचायत पाणीपुरवठा करत नसल्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे, असा ग्रामस्थांचा स्पष्ट आरोप आहे

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com