Solapur City

सोलापूर सोशल फाऊंडेशन व NIMSME तर्फे ऑनलाइन उदयोग विषयक मार्गदर्शन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापूर जिल्हा हा पूर्वापारपासून उद्योगांची भूमी म्हणून ओळखला जात आहे. ही ओळख वृद्धिंगत व्हावी, पारंपरिक उद्योगांबरोबरच इथल्या तरुणांनी व्यवसायाचे विविध पर्याय स्वीकारावेत आणि इथल्या मातीत अनेक सक्षम उद्योग उभे राहावेत हा मानस घेऊन सोलापूर सोशल फाऊंडेशन सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. एक उद्योग उभा राहतो तेव्हा तो अनेक स्थानिकांना रोजगार मिळवून देतो असे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. सुभाष बापू देशमुख नेहमी म्हणतात. आपला व्यवसाय आपल्याबरोबर अनेकांना रोजीरोटी मिळवून देत असेल तर याहून समाधानकारक काय असेल? केंद्र सरकारद्वारे अशा होतकरू, महत्त्वाकांक्षी उद्योजकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.

MSME म्हणजेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे लहानमोठ्या उद्योगांसाठी अनेक योजना सुरू आहेत. यामध्ये प्रशिक्षणापासून कर्ज योजनेपर्यंत अनेक बाबींचा समावेश आहे. व्यावसायिक होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींपर्यंत या योजना तपशीलवार पोहोचाव्यात, त्यातले बारकावे व योग्य मार्गदर्शन मिळून आपल्या मार्गाची सुनियोजित आखणी करता यावी यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन एक महत्वाचे पाऊल उचलत आहे.
दि.२५ फेब्रुवारी २०२१ गुरूवार रोजी सकाळी ११.००ते १२.३० या वेळेमध्ये सोलापूर सोशल फाऊंडेशन व NIMSME यांच्या संयुक्त विद्यमाने
‘MSME Schemes and Institutional Support’ या विषयावर ऑनलाइन मिटिंगचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र पूर्णतः मोफत असून त्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. या चर्चेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे मान्यवर तज्ज्ञ व विषयांची माहिती असणारे आहेत.

या मिटिंगसाठी नोंदणी करण्यासाठी व या संदर्भातील अधिक माहितीसाठी,सोलापूर सोशल फाऊंडेशन च्या 7767080999 या क्रमांकाच्या व्हाट्सप वरती आपले नाव पाठवावे, आपल्याला मीटिंग ची लिंक पाठवली जाईल असे आवाहन करण्यात येत आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143