Solapur City News 44
Solapur City School & Collage

पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत ऑनलाईन पोर्टल सुरू

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर – राज्यात विभागीय, जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विकास विभागाव्दारे शासकीय वसतिगृह योजना कार्यन्वित आहे. सन 2021 – 22 या शैक्षणिक वर्षात मोठी शहरे (महानगरांमध्ये) विभागीय स्तर, जिल्हास्तर व तालुकास्तरावर इयत्ता 10 वी नंतरच्या दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या तंत्र शिक्षण व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पंडीत दिन दयाल स्वयंम योजनेंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट रक्कम वितरण करण्यास मान्यता मिळालेली आहे. त्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी त्या त्या अभ्यासक्रमाचे निकाल लागल्यापासून swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळाव्दारे दि.30 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करावयाची आहे. तसेच प्रवेश घेतलेल्या अनु.जमातीच्या विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यात पुढीलप्रमाणे रक्कम अदा करण्यात येते.
इतर महसूली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम भोजन भत्ता 28000/- हजार रूपये, निवास भत्ता 15000/- हजार रूपये, निर्वाह भत्ता 8000/- हजार रूपये. इतर जिल्ह्याचे ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्क्म भोजन भत्ता 25000/- हजार रूपये, निवास भत्ता 12000/- हजार रूपये, निर्वाह भत्ता 6000/- हजार रूपये.

हे वाचा – मोदी सरकारने सनदी अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे दिली मोठी जबाबदारी

         तालुका ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम भोजन भत्ता 23000/- हजार रूपये, निवास भत्ता 10000/- हजार रूपये, निर्वाह भत्ता 5000/- हजार रूपये. या रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रू. 5000/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रू.2000/- इतकी रक्क्म शैक्षणिक साहीत्यासाठी रोख स्वरूपात देण्यात येते. महानगरपालिका / नगरपालिका हद्दीमध्ये आणि महानगरपालिका / नगरपालिका हद्दीपासून 05 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात / शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील. तरी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पंडीत दिन दयाल उपाध्याय स्वयंम योजना या योजनेंतर्गत प्रवेश घेण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर यांनी केले आहे.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews