Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- कोरोना महामारी च्या काळात नागरिकांचे आरोग्य उत्तम आणि सुदृढ राहावे यादृष्टीने आमदार विजयकुमार देशमुख यांनी शहरातील विविध भागात ओपन जिमची संकल्पना हाती घेतली होती प्रभाााग क्रमांक 5 बाळे येथे आमदार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून आणि निधीतून ओपन जिम साकारण्यात आली आहे. या जिमचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख प्रभाग क्रमांक 5 च्या नगरसेविका स्वाती आवळे, नगरसेवक विनायक विटकर,नागेेश भोगडे, परिवहन सदस्य पिंटू महाले, आलूरे, समाधान आवळे, विनय ढेपे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. बाळे परिसरातील नागरिकांनी खासदार व आमदार निवडणुकीला भाजपा वर भरभरून प्रेम केले आहे परंतु महानगरपालिकेला या भागातून भाजपचा उमेदवार निवडून येत नाही तरीही या भागात आम्ही पूर्ण क्षमतेने विकास कामे करत आहोत त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत या या भागातून भाजपाच्या नगरसेवकाला विजयी करून भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे नागरिकांनी उभे राहावे मतदान रुपी दिलेल्या आशीर्वादाची परतफेड विकासाच्या माध्यमातून करण्याची ग्वाही यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपस्थित नागरिकांना दिली.
सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी बाळे, कोंडी शिवाजीनगर या भागासाठी भरीव असा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले येणाऱ्या काळात नागरिकांनी भाजपाच्या पाठीशी उभे राहावे भाजप हा विकासाचा रथ असाच पुढे नेईल असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागेश कोकरे, नाना शिंदे, शिरीष सुरवसे ,सुहास माने, गणेश काळे, झाडे सर, स्मिता भावे, पप्पू रजपूत, गणेश सालगे, अमोल जाधव, शिवलिंग शिवपुरे, शिवाजी भोसले, युवराज भोसले, संतोष दोरकर, संतोष सरवदे, महेश भोसले, अजित जाधव, राहुल सरवदे, नारायण इगवे, कौशल बंडगर, संकेत साळुंके, विकास माने, निलेश रंगारी यांच्यासह बाळे परिसरातील भाजपाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू आलुरे यांनी केले तर आभार विनय ढेपे यांनी मानले.
#solapurcitynews