fbpx
Solapur City News 20

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

ठाणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डाॅ जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एनकेटी हाॅलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आलेली असतानाच आता रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या पुढील आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी करून स्वतः रक्तदान केले होते. त्यांच्या आदेशानुसारच सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेदरम्यान रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.यावेळी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे व कार्यकर्ते उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update