FB IMG 1631974845219
Maharashtra Solapur City

अक्कलकोट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवसीय नवभारत मेळावा प्रदर्शनाचे आयोजन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

अक्कलकोट- अक्कलकोट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवसीय नवभारत मेळावा प्रदर्शनीचे खासदार डॉ. शिवाचार्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या शुभहस्ते व आमदार श्री. सचिन (दादा) कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त या अनोख्या प्रदर्शनीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये मोदींजींच्या बालपणीपासून ते आजपर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या घटनांसोबतच अनेक महत्वपूर्ण निर्णय व पैलूंचा सचित्र समावेश करण्यात आला आहे.
            यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, भाजपा अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष चांगदेव कांबळे, भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, भाजपा अक्कलकोट शहराध्यक्ष शिवशरण जोजन, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव, विकास वाघमारे, प्रदीप पाटील , रणजित जाधव, अक्कलकोट तालुका युवा मोर्चा अध्यक्ष दयानंद बमनळी, शहर अध्यक्ष ऋषी लोणारी, भाजपा युवा मोर्चा चे सर्व पदाधिकारी व अक्कलकोट नगरपालिकेचे नगरसेवक, ग्रामपंचायत सरपंच पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143