outbreak-of-omecron-in-satara
Covid 19 Maharashtra

Omycron : साताऱ्यात येऊन ठेपला ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव; 4 जणांना ओमायक्रॉनची लागण

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सातारा Omycron – जगभरात अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सातारा जिल्ह्यातही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. गेल्या वीस दिवसांत परदेशातून सातारा जिल्ह्यात सुमारे पाचशेहून अधिक नागरिक आले असून त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यातील काही नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून 4 जण बाधित आढळले आहेत. फलटण येथील पाच जणांचे नमुने जेन्युम सिक्वेसिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते त्यातील तिघांचा रिपोर्ट ओमायक्रॉन बाधित आला आहे. जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी घेतला राष्ट्रवादीच्या मोर्चाचा धसका; 23 तारखेपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन

      Omycron करोना नियंत्रणात आला असतानाच नव्याने आलेल्या ओमायक्रॉन’ Omycron च्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग (Health Department of Satara Zilla Parishad) आणखी सतर्क झाला आहे. दि. 28 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत विविध देशातून सातारा जिल्ह्यात पाचशेहून अधिक नागरिक आले असून त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यातील चार जण बाधित आढळले आहेत. फलटण येथील पाच जणांचे नमुने जेन्युम सिक्वेसिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. त्यातील तिघांचा रिपोर्ट ओमायक्रॉन बाधित आला आहे. जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. तिघे ओमायक्रॉन Omycron बाधित आढळले असले तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी केले आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com