Economy

कोरोनावर मात करीत जिल्ह्याला सर्वांग सुंदर जिल्हा बनविणार – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
  • कर्जमुक्ती योजनेतून लक्ष ६९ हजार ५९६ शेतकऱ्यांना ११२१ कोटींचा लाभ

  • शिव भोजन थाळी योजनेतून ५ लक्ष ४१ हजार १६९ लाभार्थ्यांना लाभ

  • गुटखामुक्त महाराष्ट्र अभियान राबविणार

  • कोविड लसीकरण मोहिमेत २५०० लाभार्थ्यांना आतापर्यंत लस

बुलडाणा- कोरोना नावाच्या अदृश्य विषाणूने आपणाला चिंताक्रांत बनविले होते. या विषाणूचा संसर्ग थोपविण्यासाठी राज्य शासनाने प्रशासनासोबत घेत विविध उपाययोजना राबविल्या. परिणामी कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यात शासनाला यश आले. कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करीत जिल्ह्याला सर्वांग सुंदर जिल्हा बनविणार, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले. भारतीय प्रजासत्ताकाचा ७१ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार श्वेताताई महाले, जि.प अध्यक्षा मनिषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत, माजी आमदार सर्वश्री विजयराज शिंदे, राहुल बोंद्रे,  वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी गिते आदींसह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक यांची उपस्थिती होती. कोरोनावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जिल्ह्यात आठवड्यातून पाच दिवस दहा केंद्रावर लसीकरण सुरू असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ.शिंगणे म्हणाले, जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने कोविड लस दिल्या जात आहे. आतापर्यंत २५०० लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. मागील काळात राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत राज्य शासनाने रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्ताचा तुटवडा भविष्यात निर्माण न होण्यासाठी प्रत्येकाने रक्तदान करण्याचे आवाहनही पालकमंत्री यांनी केले. जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, अशा हवालदील परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आर्थिक मदत जाहीर केली. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात प्राप्त निधीपैकी १ लक्ष ८ हजार ५०३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४८ कोटी ५० लक्ष रूपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले आहे.  राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हे, तर चिंतामुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे.  जिल्ह्यात १ लक्ष ६९ हजार ५९६ लाभार्थी शेतकऱ्यांन११२१ कोटी रूपये त्यांच्या थेट कर्ज खात्यात जमा करण्यात आले आहे. यामुळे बळीराजावरील कर्जाचे ओझे निश्चितच उतरले आहे.

ते पुढे म्हणाले, गरीब व आर्थिक दुर्बल घटकाला नाममात्र पाच रूपये दरात दर्जेदार जेवण देण्यासाठी शिव भोजन थाळी योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यात १७ केंद्रामधून ५ लक्ष ४१ हजार १६९ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. तसेच दरमहा अंत्योदय, प्राधान्य कुटूंब व शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना १ लक्ष २० हजार क्विंटल धान्याचे नियमित वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेमधून सन २०२०-२१ मध्ये आतापर्यंत ४३ हजार १६२ व्यक्तींना रोजगार देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात रोहयो अंतर्गत ८११ कामे सुरू असून त्यावर ४ हजार १९१ मजूरांची उपस्थिती आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागात सन २०१९-२० मध्ये २ हजार ५६५ घरकूल पूर्ण करण्यात आली आहे. सद्यस्थितीत ३ हजार ९६३ घरकुलांचे काम मंजूर करण्यात आले आहे.  जिल्ह्यात  जिगांवसोबतच जिल्ह्यात अरकचेरी, चौंढी, आलेवाडी या लघु प्रकल्पांची कामे सुरू आहे.  जिगांव प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यातील २२ गावांपैकी ३ गावांचे पुनर्वसन पुर्ण करण्यात आले आहे. तसेच १० गावांचे पुनर्वसन प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्र गुटखामुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करताना पालकमंत्री म्हणाले, आरोग्यासाठी घातक असणारा गुटखा अवैधरित्या राज्यातून हद्दपार करण्यात येत आहे.  त्यासाठी भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ सोबतच कलम ३२८ आता गुटखा विक्री किंवा साठवणुकीच्या गुन्ह्यात लावता येणार आहे.  जिल्ह्यात  मागील कालावधीत ६४ लक्ष ४६ हजार रूपये किमतीच्या प्रतिबंधीत गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यात ३ लक्ष ५१ हजार ९१७ कुटूंबांना वैयक्तिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  प्रत्येकाला दरडोई ५५ लिटर पाणी मिळण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात जल जिवन मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे.  विविध ४० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तींचे वाटप करण्यात आले आहे कोविडवरील लस आली असली तरी बाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क, वारंवार हात धुणे किंवा सॅनीटाईज करणे आणि सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे ही त्रि सुत्री अंगीकारणे गरजेचे आहे. भविष्यात कोविड सारख्या साथरोगांना यशस्वीपणे रोखण्यासाठी ही त्रि सुत्री प्रत्येकाने अंगीकारावी, असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री यांना पोलीसांकडून सलामी देण्यात आली. कार्यक्रमाचे संचलन नरेंद्र लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, समाज भूषण पुरस्कार प्राप्त,  विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी कोरोनावर मात केल्याबद्दल कोरोना योद्धा म्हणून श्रीमती सविता तुळशीराम तायडे, श्रीमती पुष्पाताई जाधव, मिर्झा अनिस बेग मिर्झा अन्वर बेग, दशरथ हुडेकर, संजय तायडे, गणेश बिडवे यांना विशेष निमंत्रीत करण्यात आले होते

.#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143