fbpx
images 2 दिलासादायक बातमी| बार्शीत उपलब्ध होणार आणखी १०५ ऑक्सिजन बेड

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- बार्शी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये आणखी १०५ ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली जाणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी आज खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घेतली. त्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आणि निर्णय घेण्यात आला. डॉ. ढेले यांनी आज नर्गिस दत्त हॉस्पिटल आणि जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये भेट देऊन पाहणी केली.
               त्यानंतर त्यांनी जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये बैठक घेतली. बैठकीत वैद्यकीय अधीक्षक डॉ. शीतल बोपलकर, डॉ. संतोष गायकवाड, डॉ. अनिल माळी, आयएमएचे  बार्शी अध्यक्ष डॉ. प्रकाश मोहिरे, डॉ. तरंग शहा उपस्थित होते.  बैठकीत खासगी दवाखान्यात ऑक्सिजन बेडची संख्या वाढवणे, कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु करणे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ नियमानुसार देणे याबाबत चर्चा झाली.  डॉ. तरंग शहा यांनी १५ ऑक्सिजन बेडसह कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी तयारी दाखवली. नर्गिस दत्त हॉस्पिटलमध्ये चाळीस ऑक्सिजन बेड सुरु करण्याचे प्रशासनाने मान्य केले. हॉस्पिटलमध्ये आरटीपीसीआर चाचणी करणारी मशीनरी लवकरच कार्यान्वित केली जाणार असल्याचे सांगितले.  डॉ. ढेले यांनी कोठारी आणि पाटील पैथॉलॉजी लैबोरेटरीस भेट देऊन रैपिड ऐंटीजेन टेस्ट करण्याबाबतची प्रक्रिया, माहिती संकलित करण्याची पध्दती याबाबतची माहिती दिली. बैठकीत बार्शी मधील खासगी वैद्यकीय विशेष तज्ञ उपस्थित होते.  

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update