oxygen production in the hospital of Central Railway
Solapur City Health

मध्य रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्पाचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी कडून उदघाटन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर रेल्वे हॉस्पिटलमध्ये मिनिटाला 500 लिटर प्राणवायूची होणार निर्मिती
सोलापूर- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत होती. हीच बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागांतील डॉ. द्वारकानाथ कोटणीस रेल्वे हॉस्पिटलमध्ये मिनिटाला 500 लिटर ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. आज दिनांक 07. ऑक्टोबर-2021 रोजी मा. खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रंसगी सोलापूरचे मा. महापौर सौ श्रीकांचना यन्नम, विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री शैलेश गुप्ता, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री शैलेद्र सिंह परिहार वरिष्ठ वाणिज व्यवस्थापक एवं जनसंपर्क आधिकारी श्री प्रदिप हिरडे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक – डॉ. वि. के. कन्नन, सहा. वैद्यकीय अधीक्षक – डॉ. आनंद काबळे, आणि अन्य रेल्वे अधिकारी उपस्थित होते. या प्लांटमुळे 100 रुग्णांची सोय होणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आरोग्य विभागाकडून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासू नये यासाठी मध्य रेल्वे कडून रेल्वे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारले आहे. त्यासाठी लागणारी यंत्र सामग्री ही दिल्ली येथून मागविण्यात आली आहे. दर मिनिटाला 500 लिटर क्षमता असलेला ऑक्सीजन प्लांट उभारण्यात आला आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटमुळे जवळपास 100 रुग्णांना ऑक्सिजन पुरेल इतकी हॉस्पिटलमध्ये सोय झाली आहे.

प्रियांका गांधी यांच्या अटकेचा सोलापूरातील आ. प्रणिती शिंदेनी केला निषेध

ठळक बाबी
– 100 रुग्णांची होणार सोय
– दर मिनिटाला 500 लिटर होणार ऑक्सिजन निर्मिती
– दिल्ली येथून ऑक्सिजन प्लांटची यंत्र सामग्री आणण्यात आली
– 46.88 लाख खर्च
– हॉस्पिटलमध्ये एकूण सहा व्हेंटिलेटरचा समावेश
– आणि 08 आयसीयु बेडची सुविधा
– 97% रेल्वे कर्मचा-यांचे कोरोनाचे लसीकरण झाले आहे.

लहान मुलांसाठी 20 बेडची सुध्दा सुविधा करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने ऑक्सीजन प्लांटची निर्मिती करण्याबरोबरच बेडची संख्या वाढविण्याचे काम केले आहे. त्यामुळे डॉ. द्वारकानाथ कोटणीस रेल्वे हॉस्पिटलमध्ये बेड वाढविण्यात आले आहेत. बेडची संख्या वाढविण्यात आल्यामुळे रुग्णांची सोय झाली आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com