Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- दक्षिण सोलापूर तालुक्यात बोरामणी येथे ५० बेडचे कोव्हीड ऑक्सिजनचे रूग्णालय उभारल जात आहे. मासिक सभेत धनेश आचलारे यांनी मागणी केले होते. यामागणीचा विचार करून पंचायत समितीचेगटविकास अधिकारी राहुल देसाई साहेब व तहसीलदार अमोल कुभांर साहेब यांच्या सहकार्याने व पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे यांच्या प्रयत्न केल्याने यांच्या मागणीला यश आलेली आहे. सध्या सोलापूरात सर्वच रूग्णालय कोरोनाबांधित रुग्णामुळे बेड फुल्ल झालेले आहेत. म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेसाठी मंद्रूप, बोरामणी, कुंभारी येथे कोविड ऑक्सिजन रूग्णालय तातडीने उभारण्याची तयारी सुरू आहेत. दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या मासिक सभेत कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थिती सह विकासकामांचा आढावा घेतला. वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता तालुक्यातील कोरोनाबांधित रूग्णाना शहरात बेड उपलब्ध होत नाहीत. उपचाराभावी मृत्यु होऊ नये. यासाठी बोरामणी येथील ग्लोबल व्हीलेज या शाळेत व बसवनगरच्या श्रीकृष्ण हॉल येथे ऑक्सिजन कोविड रूग्णालय तातडीने उभारण्यात येत आहे. एनटीपीसी वीज प्रकल्प यांच्या वतीने बोरामणी येथील ग्लोबल व्हीलेज या शाळेत ५० बेडसाठी ऑक्सिजन मिळणार असून व पंचायत समिती कडून कोव्हीड ऑक्सिजन रुग्णालय बेड व डॉक्टर व आरोग्य विभागाचे १० कर्मचारी येथे असणार आहेत. ऑक्सिजन रुग्णालय उभारण्याची प्रक्रिया तहसीलदार अमोल कुंभार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल देसाई यांच्या सहकार्याने लवकरात लवकर उभारण्यात येत आहे.
#solapurcitynews