227291 illegal construction 4
Maharashtra

म्हणून अनधिकृत बांधकामावर लवकरच पालिकेचा हातोडा पडणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
नाशिक- शहर स्मार्ट ठेवण्यासाठी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण न होऊ देण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, अशा नाशिक महापालिकेने आपल्या मंजूर अभिन्यासातील खुल्या जागा व ॲमिनिटी स्पेसमध्ये अनधिकृत बांधकामे केली असून त्यावर बुलडोझर फिरविण्याची तयारी आता सुरू केली आहे. ३६ मिळकतींमध्ये खुल्या जागा व ॲमिनिटी स्पेसमध्ये सार्वजनिक वापराच्या इमारती उभ्या करताना अनुज्ञेय बांधकामापेक्षा अधिक बांधकाम केल्याचे समोर आले आहे. वीस वर्षांसाठी महापालिका हद्दीत विकास आराखडा तयार केला जातो. विकास आराखडा प्रमुख उद्देश म्हणजे शहराच्या समतोल विकासासाठी विविध नागरी प्रयोजने करणे गरजेचे असते. त्यासाठी पालिकेला भूखंडांची गरज भासते. त्यामुळे महापालिका मोकळ्या भूखंडांवर आरक्षण टाकून त्याचे भूसंपादन करते. १९९५ मध्ये महापालिकेचा पहिला विकास आराखडा आल्यानंतर विविध प्रकारच्या आरक्षणांवर तब्बल १०७५ मिळकती उभारल्या आहेत. यात सार्वजनिक वाचनालये, अभ्यासिका, व्यायामशाळा, समाजमंदिर आदी मिळकतींचा समावेश आहे.
#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com