Covid 19 Health

महेंद्रसिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

 मुंबई- जीवघेण्या कोरोना व्हायरसचा शिरकाव आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या घरातही झाला आहे. एमएस धोनीचे वडिल पान सिंह धोनी आणि आई देवकी सिंह धोनी यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर दोघांनाही झारखंडची राजधानी रांची येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, सध्या आयपीएल 2021 सुरु असून चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीही आपल्या संघासोबत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एमएस धोनीचे आई-वडील रांची येथील पल्स सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. धोनी यूएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल 2020 नंतर आपल्या कुटुंबियांसोबत रांची येथेच होता. सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या सामन्यांपूर्वी धोनीने कोणताच सामना खेळलेला नव्हता. 

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com