Solapur City News 58
Health

रुग्णांची गैरसोय होवू नये म्हणून पार्कींग प्लाझामधील रुग्णांचे ठाणे कोविड रुग्णालयात स्थलांतर

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
ॲाक्सीजनचा पुरवठा कमी प्रमाणात ठाणे महानगरपालिकेच्या वतीने खुलासा
ठाणे- सद्यस्थितीतॲाक्सीजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने पार्किंग प्लाझा कोविड रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी त्यांना ठाणे कोविड रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आल्याचे स्पष्टीकरण ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. ठाणे पार्किंग प्लाझामधील रुग्णांना अचानक स्थलांतरित येत असल्यामुळे नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली होती त्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्यावतीने हा खुलासा करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत सर्वत्र ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे रात्री अपरात्री पार्किंग प्लाझामधील अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांची ऑक्सिजन अभावी गैरसोय होवू नये तसेच सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्व रुग्णांना ठाणे कोविड हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय महापालिकेच्यावतीने घेण्यात आला आहे. तरी रूग्णांच्या नातेवाईकांनी घाबरून जावू नये असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143