Solapur City News 60
Health Solapur City

म्हाडा कॉलनीतील रुग्णांसाठी देण्यात येणारे उकडलेले अंडे कुठे गायब- नगरसेवक सुरेश पाटील

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

पालिका आयुक्तांनी अंडे घोटाळ्याबाबत सखोल चौकशी करावे
सोलापूर- सोलापूर शहरात कोरोना रुग्ण वाढत असताना कोव्हिड सेंटर मध्ये सुविधा मिळत नसल्याने नगरसेवक सुरेश पाटील यांनी दोन दिवसांपासून सेंटरला भेट देऊन पाहणी केली. शनिवारी दुपारी म्हाडा कॉलनीतील कोव्हिड केअरमध्ये अचानक नगरसेवक सुरेश पाटील हे दाखल होताच त्या सेंटर मधिल रुग्णांनी सर्व सोईसुविधा मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले. याप्रसंगी नगरअभियंता संदीप कारंजे, म्हाडा कोव्हिड केअर सेंटर प्रमुख नजीर शेख सह अधिकारी उपस्थित होते. सोलापुरातील सर्व सेंटर मध्ये जेवणाची व्यवस्था निकृष्ट असल्याने रुग्णांचा संताप वाढला होता. सकाळी चहा, नाश्ता, दुपारी व रात्री जेवण सह पोषण आहारासाठी उकडलेले अंडे व बुधवार आणि रविवारी नॉनव्हेज जेवण देण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिले होते. परंतु सर्व प्रकारच्या जेवणाची व्यवस्था केली असली तरी पोषण आहारासाठी गेली चार महिन्यापासून एकही अंडे न दिल्याचे उघड झाले आहे. पालिकेतर्फे जेवण देण्यात येत असताना सर्व कोव्हिड सेंटर मध्ये जेवणाचे फलक व दररोज येणाऱ्या-जाणाऱ्या रुग्णांची माहिती दर्शनीभागात लावणे गरजेचे आहे. वेळोवेळी जेवण व सर्वसोईयुक्ती असले तरी रुग्णांना दिले जाणारे उकडलेले अंडे कुठे गायब झाले ? आजवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना ही बाब का लक्षात आली नाही? आजवर गायब झालेल्या अंड्यांवरील लावलेले बिले ही मंजूर झालीच कशी? एकीकडे सर्व कोव्हिड सेंटर मध्ये दिवसेंदिवस रुग्ण वाढत असताना दुसरीकडे निकृष्ठ दर्जेचे जेवण व गायब झाले अंडे यावर लक्ष देऊन मक्तेदाराला काळ्या यादीत टाकून नवीन मक्तेदाराला नेमणूक करावे ज्या मक्तेदाराने चुकीच्या पद्धतीने जेवण वाटप करून शासनाची फसवणूक केल्याने त्या मक्तेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी सुरेश पाटील यांनी केले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर घरी येऊन घेऊन जातात तसे बरे झाल्यानंतर घरी पाठवण्याची सोय करावे. कारण येताना काही गरीब नागरिक पैसे आणत नाहीत आणि घरी जाताना पुन्हा कोणाला लागू होऊ नये यासाठी प्रयत्न करावे- रुग्ण, म्हाडा कॉलनी
#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143