Health

भगवान महावीर कोविड हॉस्पिटलमधून रूग्णांना चांगली सेवा मिळेल

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सांगली- सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा अडचणीच्या काळात जैन समाज व श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट यांनी श्री भगवान महावीर कोविड हॉस्पिटल, सांगली येथे अत्यंत कमी वेळेत उभे केले. या हॉस्पिटलमधून कोविड रूग्णांना चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. नेमिनाथनगर, सांगली येथे श्री भगवान महावीर कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर दिग्वीजय सूर्यवंशी, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, भालचंद्र पाटील आदि उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, ऑक्सिजन निर्मितीची क्षमता मर्यादित असल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. नागरिकांनी घरी राहून कोरोनापासून सुरक्षित रहावे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी झाली तर अनेक प्रश्न आटोक्यात राहतील. श्री भगवान महावीर कोविड हॉस्पिटलची क्षमता 75 बेड्सची असून प्रारंभी अत्याधुनिक सेवासुविधांनी युक्त अशा 35 बेड्सची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये 15 बेड्स आयसीयु व्हेंटिलेटर व हायफ्लो नेझलयुक्त तसेच 20 ऑक्सिजनयुक्त बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी अतिशय चांगली व्यवस्था निर्माण केल्याचे ते यावेळी म्हणाले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com