Maharashtra

कोविड व कॉरनटाईन सेंटर येथे रूग्णांना मिळणार आठवड्यातुन तीन दिवस मांसआहार जेवण व रोज अंडे -अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापूर शहरांमध्ये कोरोनचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिकेच्या माध्यमातून विविध ठिकाणी कोविड पॉझिटिव पेशंट व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था प्रामुख्याने सिंहगड कॉलेज, म्हाडा बिल्डींग, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, वाडिया हॉस्पिटल, पोलिस प्रशिक्षण केंद्र केगाव ,सोलापूर विद्यापीठ, भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज या ठिकाणी सोय करण्यात आली आहे.
             मा आयुक्त पि.शिवशंकर यांच्या निर्देशांने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कोविड व कॉराटाईन सेंटर येथे जेवण देणाऱ्या नव्याने नियुक्त करण्यात आलेला मक्तेदारांच्या किचन तपासणीसाठी आज अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी त्या ठिकाणी भेट देऊन जेवणाची तपासणी तसेच स्वच्छता, जेवणाचे प्रमाण आदींची तपासणी करून नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या मक्तेदारांना यापुढे कोविड सेंटर व कॉराटाईन सेंटर येथील रुग्णांसाठी आठवड्यातून बुधवार,शुक्रवार,रविवार या तीन दिवस मांसआहार जेवण द्यावे तसेच रोज नाश्त्यासोबत उकडलेले अंडे देण्यात यावे असे आदेश दिले. तसेच ज्या मक्तेदार जेवण व्यवस्थितपणे देत नाहीत किंवा कमी प्रमाणात देतात असे निदर्शनास आल्यास त्यांचावर कारवाई करण्यात येईल अशी सूचना यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय खराटे यांनी दिली. त्यानंतर सोलापूर शहरातील वाढता कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता शहरातील विविध कोविड केअर सेंटर व कॉरटाईन सेंटर येथे भेट देऊन त्या ठिकाणाची व्यवस्थेची पाहणी केली तसेच ज्या ठिकाणी डॉक्टरांचे व कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे अशा ठिकाणी डॉक्टरांची व कर्मचारी यांची नेमणूक त्वरित करण्यात येईल असेही अतिरिक्त आयुक्त म्हणाले त्यानंतर त्यांनी सिंहगड कोविड केअर सेंटर येथील रुग्णांशी संवाद साधला संवाद दरम्यान त्यांनी रुग्णांची विचारपूस केली तसेच आपल्याला देण्यात येणारा जेवणाबद्दल व इतर सुविधाबद्दल माहिती घेतली यावेळी त्या ठिकाणी असलेले रुग्णांनी या ठिकाणी व्यवस्थित रित्या देखभाल होत आहे तसेच जेवण देण्यात येणारा अन्न काही दिवसापूर्वी चांगल्या प्रतीचे नव्हते पण गेल्या दोन दिवसापासून आम्हाला देण्यात येणारे जेवण हे व्यवस्थितपणे असून यापुढेही असेचे जेवण देण्यात यावे अशी आशा त्याठिकाणी उपस्थिती असलेल्या रुग्णांनी केली.यावेळी सहनीयंत्रण अधिकारी सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील,नगर अभियंता संदीप कारंजे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143