IMG 20211004 WA0000
Maharashtra Solapur City

शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त नगरसेवक सुरेश पाटील यांनी रुपाभवानी मंदिर व परिसराची पाहणी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- शारदीय नवरात्र महोत्सवाला गुरुवार पासून सुरवात होत असून श्री रुपाभवानी मंदिरात धार्मिक विधी व नित्योपचार पूजा केली जाते. घटस्थापनेपासून दसरा आणि पौर्णिमेपर्यंत अनेक भाविक शहर जिल्ह्यातून रुपाभवानी मंदिराला दर्शनासाठी येत असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घटस्थापनेच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील सर्व मंदिरे उघडत असून अनेक मंदिरांसह सोलापुरातील रूपाभवानी मंदिरात गर्दी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विभागीय झोन क्रमांक 2 व 3 यांच्या वतीने भाविकांसाठी साफसफाई स्वच्छता व कोरोना नियम पाळत दोन्ही डोस घेतलेल्यानाच मंदिरात प्रवेश देणार आहे.
                  सोमवारी सकाळी नागरिकांचे तक्रार येताच सुरेश पाटील यांनी रुपाभवानी मंदिराची पाहणी केले. पालिकेच्या वतीने साफसफाई स्वच्छता न केल्याने अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य व ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने खड्डे दिसून आले. सोमवारी सकाळी नगरसेवक सुरेश पाटील यांनी सर्व अधिकाऱ्यांना बोलावून मंदिर परिसरातील साफसफाई स्वच्छता, मंदिर परिसर प्रकाशमय करणे आदीसह पालिकेची बंद पडलेल्या मंगल कार्यालयात कोरोना लसीकरण व कोरोना टेस्टिंगसाठी वापरण्यात यावा तर भाविकांसाठी चालते फिरते शौचालय गाडी थांबवण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतले. दरम्यान सोमवारी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर नगरसेवक सुरेश पाटील आणि नगर अभियंता संदीप कारंजे यांनी रुपाभवानी मंदिर परिसराचे महापालिकेच्या झोन कर्मचाऱ्यांना समवेत पाहणी करून रस्त्यांवरील खड्डे बुजविणे समाज मंदिराची स्वच्छता नाल्यांची साफसफाई व मंदिराचे पावित्र्य राखण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केले.
               याप्रसंगी रुपाभवानी मंदिराचे अध्यक्ष मल्लिनाथ लातुरे उपाध्यक्ष संताजी भोळे, सचिव जगदेव बंडगर, नगरसेवक सुरेश पाटील, पालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे, मंदिराचे पुजारी राजू पवार, संजय पवार, पतंगे परिवार, झोन अधिकारी लामकाने, सातपुते, आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार, गोटे, जे.ई अंजना कोने, जे.ई मुंढेवाडी व आरोग्य विभागाचे अधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

On the occasion of Autumn Navratra Festival, Corporator Suresh Patil inspected Rupabhavani Temple and its surroundings
On the occasion of Autumn Navratra Festival, Corporator Suresh Patil inspected Rupabhavani Temple and its surroundings

7 ऑक्टोंबर पासून सर्वच धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे त्या पार्श्वभूमीवर विविध मंदिरांमध्ये शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त जय्यत तयारी सुरू आहे लाखो भक्तांचे आराध्य दैवत असणार्‍या सोलापूर शहरातील रुपाभवानी मंदिर येथे नवरात्र महोत्सवाची लगबग सुरू आहे. येणाऱ्या दोन दिवसात रूपाभवानी मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांसाठी कोरोना नियम पाळणे व साथीचे रोग पसरू नये यासाठी पालिकेच्या वतीने काळजी घेण्यात येणार आहे. परिसरातील साफसफाई स्वच्छता, रुपाभवानी चौकातील कचरा डेपो मधिल कचऱ्याची विल्हेवाट लावणे, मंदिराजवळ असलेल्या पालिकेच्या मंगल कार्यालयात कोरोना लसीकरण उभे करणे, रुपाभवानी मंदितलागत नाल्याची स्वच्छता करणे, भाविकांसाठी चालते फिरते शौचालय गाडी लावणे, मंदिर परिसर प्रकाशमय करणे आदी कामांचा आढावा घेऊन त्वरित संबंधित विभागास कामे मार्गी लावण्यासाठी सांगितले आहे.
सुरेश पाटील, नगरसेवक, प्रभाग क्रमांक 3

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143