pending-cases-district-vigilance
Crime Maharashtra

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीकडे प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा जलद गतीने निपटारा करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

मुंबई – जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती अंतर्गत समितीकडे प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा जलद गतीने निपटारा करावा तसेच अनुसुचित जाती,अनुसुचित जमाती(अत्याचार प्रतिबंध)कायद्याचे सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी  काटेकोरपणे पालन करावे असे आदेश मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले.

वन्यजीवांच्या संवर्धनासह वनपर्यटनातून ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्राचा विकास साधणार

           वांद्रे येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी श्रीम. निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.यावेळी मुंबई  उपनगर जिल्ह्यातील समितीचे सदस्य अप्पर   जिल्हाधिकारी मुंबई उपनगर निलीमा धायगुडे , समाज कल्याण चे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार,अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे प्रतिबंधक)  व नागरी हक्क संरक्षण  व सहाय्यक पोलीस आयुक्त  यांचे पदाधिकारी  हजर होते. अनुसुचित जाती,अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंध)  कायद्यांतर्गत अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती काम करत आहे.समितीकडे प्रलंबित असलेल्या ७१ गुन्ह्यांचा गुन्हेनिहाय आढावा घेण्यात आला.पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करताना अधिनियमातील व शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करुन गुन्हे दाखल करावेत.गुन्हा दाखल झाल्यानंतर ६० दिवसामध्ये त्यांचे दोषारोप मा. न्यायालयामध्ये दाखल करावे, व त्याचा अहवाल समितीस कळवावे.तपासावरील प्रलंबित गुन्ह्यांची निर्गती जलद गतीने करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन घ्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी बैठकीत केल्या.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com