Covid 19

अखेर पुण्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; बरे होऊन घरी जाणाऱ्या संख्येत वाढ

पुणे- सध्या महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर झाला. त्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना व्हायरस चा प्रार्दुभाव रोखण्याची लढाई सुरु झाली. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातही कोरोनाचा प्रार्दुभाव आता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. पुण्यात मंगळवारी एक हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मंगळवारी पुणे शहरात नव्यानं 739 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शहरात सध्या एॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4 लाख 66 हजार 858 इतकी आहे. मंगळवारी 1 हजार 560 कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आलं. आता एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 49 हजार 912 इतकी झाली आहे. तर काल एकाच दिवसात जवळपास 7 हजार 737 नमुने घेण्यात आलेत. त्यामुळे शहरातील एकूण टेस्ट संख्या 24 लाख 51 हजार 735 इतकी आहे.

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com