fbpx
Solapur City News
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
पंढरपूर- सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके उध्दवस्थ झाली आहेत. अशा संकट काळात राज्य शासनाने शेतकर्यांना प्रती हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करुन ओला दुष्काळ जाहीर करावा,अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी केली आहे. या संदर्भात धोत्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लेखी निवेदन दिले आहे.
               आधीच दुष्काळ, कोरोना या आपत्तीमुळे शेतकरी कर्जात बुडलेला असतानाच पुन्हा नैसर्गिक आपत्तीमुळे तो पूर्णपणे खचला आहे. शेतकर्यांना पुन्हा उभा करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता स्व निधीतून शेतकर्यांना तातडीची प्रती हेक्टर आर्थिक मदत जाहीर करावी, शेतकर्यांच्या शेतींपंपाचे आणि घरगुती वापराचे वीज बील माफ करावे, शेतकर्यांना पु्न्हा लागवडीसाठी बि बियाणे आणि खतांचे वाटप करावे असेही निवेदनात नमूद केले आहे.
              मागील चार ते पाच दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते मंडळींचे पाहणी दौरे सुरु आहेत. त्यांच्या पाहणी दौर्यातून शेतकर्यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, अजित पवार, शरद पवार, देवेंद्र फडणवीस या नेत्यांनी पाहणी केली आहे. त्यांनी आता वाट न पाहता मदत जाहीर करावी.ग्रामीण आणि शहरी भागात मायक्रो फायनान्स आणि बचत गटाकडून घेतलेले कर्ज देखील शासनाने माफ करावे असेही यावेळी धोत्रे यांनी मागणी केली. सोमवारी (ता.19) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही धोत्रे यांनी लेखी निवेदन शेतकर्यांना मदत करावी अशी मागणी केली आहे.
             राज्य शासनाने तातडीने शेतकर्यांच्या खात्यांवर मदत जमा करावी अन्यथा राज्य भरातील प्रत्येक तहसील कार्यालयावर मनसेच्या वतीने शेतकर्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही  धोत्रे यांनी दिला आहे. यावेळी , मनसेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, नगरसेवक अंबादास धोत्रे, महेश पवार,नागेश इंगोले,अमोल पुजारी, प्रथमेश पवार आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM नुकसानग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या अन्यथा आक्रोश मोर्चा काढू

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update