fbpx
download आनंदाची बातमी ! बॅडमिंटन,जलतरण खेळास जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली परवानगी
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- बंदीस्त जागेतील (इनडोअर गेम्स) जलतरण, बॅडमिंटन, स्क्वॅश, नेमबाजी इत्यादी खेळांना आजपासून परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनामध्ये काही बदल केले आहेत. त्यानूसार 14 ऑक्टोबर 2020 चे प्रतिबंधात्मक आदेश कायम ठेवून त्यामध्ये सुधारीत सूचनानुसार काही मुद्यांचा समावेश करण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे. आदेशात नमुद केले आहे की, प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्राबाहेरील जलतरण तलाव, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जांच्या खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी वापरता येतील. याबाबतच्या मानक कार्यपद्धती (स्टॅडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर) शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाकडून देण्यात येतील. योग शिक्षण देणाऱ्या संस्थांना नियमित कामकाज करण्यास परवानगी देण्यात येत आहे. मात्र त्यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मानक कार्यपद्धतीचा अवलंब करणे अपेक्षित आहे.

            प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्राबाहेरील सिनेमा हॉल, थिएटर, मल्टीप्लेक्स यांना 50टक्के बैठक व्यवस्थेच्या मर्यादेत परवानगी देण्यात येत आहे. याबाबतची मानक कार्यपद्धती सांस्कृतिक कार्यविभाग आणि स्थानिक प्राधिकरण निश्चित करतील. मात्र या सर्व बाबतीत कोविड-19 बाबतच्या यापुर्वीच्या आदेशातील सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. अशा व्यक्ती ,संस्था, संघटना विरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM आनंदाची बातमी ! बॅडमिंटन,जलतरण खेळास जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली परवानगीडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update