fbpx
2Multi आज पासून कंटेनमेंट झोनबाहेरील या व्यवसाइकाना सुरू करण्यास मिळाली परवानगी
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई-  आज पासून राज्यातील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलतरण तलाव, योगा संस्था, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि काही इनडोअर खेळांना सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती देताना असे म्हटले आहे की, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलतरण तलावांना परवानगी देण्यात येत आहे. यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देश लागू असतील.

                  प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर असलेल्या योगा संस्थांना पुनश्च सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील. बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोर शूटिंग सारख्या इनडोर क्रीडा प्रकारांनाही शारीरिक अंतर आणि सॅनिटेशनसंबंधी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर पाच नोव्हेंबरपासून मुभा देण्यात येत आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स यांनाही ५० टक्के आसन व्यवस्था पालन करण्याच्या अटीवर प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर पुन्हा सुरू करण्यासाठीही अनुमती देण्यात आली आहे. परंतु चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्समध्ये कोणत्याही खाद्यपदार्थांना परवानगी नसेल. यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना सांस्कृतिक कार्य विभाग तथा स्थानिक प्रशासनाद्वारे लागू असतील. मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे यासारख्या कोविड-19 प्रतिबंधक मार्गदर्शक निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Lockdown order 3.11.2020 Page 1 आज पासून कंटेनमेंट झोनबाहेरील या व्यवसाइकाना सुरू करण्यास मिळाली परवानगी Lockdown order 3.11.2020 Page 2 आज पासून कंटेनमेंट झोनबाहेरील या व्यवसाइकाना सुरू करण्यास मिळाली परवानगी

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM आज पासून कंटेनमेंट झोनबाहेरील या व्यवसाइकाना सुरू करण्यास मिळाली परवानगीडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update