Solapur City News 48
Solapur City

उद्योजक बनण्यासाठी जिद्द आणि चिकाटी आवश्यकः आ. सुभाष देशमुख

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर – नोकरी मिळत नाही म्हणून काही तरी करू म्हणत जे व्यवसाय करतात ते कधीच उद्योजक बनत नाहीत. उद्योजक बनण्यासाठी जिद्द आणि चिकाटी गरजेची आहे, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले. लोकमंगल फाऊंडेशनच्यावतीने आयोजित व्यवसाय आणि मार्गदर्शन शिबिरात आ. देशमुख बोलत होते. यावेळी उद्योजक संकेत जेसुदास उपस्थित होते. आ. देशमुख म्हणाले की, आजच्या युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवयाय करावा. हे करताना तीव्र इच्छा शक्ती आणि उद्योजकीय मानसिक तयारी असणे महत्त्वाचे आहे. उद्योग, व्यवसाय निवडण्यासाठी आणि उद्योग व्यवसाय करताना काही अडचणी आल्या तर लोकमंगल फाउंडेशन आपल्याला कायम मदत करेल. यावेळी संकेत जेसुदास यांनी उद्योग, संधी आणि सोलापूरकरमधील निवांत पणा कसा मोडीत काढता येईल यावर मार्गदर्शन केले. राजशेखर शिंदे यांनी शासकीय व निमशासकीय कर्ज योजनांची माहिती दिली. लोकमंगल बँकेचे विनायक यरगल यांनी बँकेची भूमिका काय असते हे स्पष्ट केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143