Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई- संसदेच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायु या विषयावरील स्थायी समितीच्या सदस्यांनी समितीचे अध्यक्ष रमेश बिधुरी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. रमेश बिधुरी यांनी यावेळी राज्यपालांना समितीच्या कार्याची माहिती दिली. समितीचे सदस्य खासदार डॉ भागवत कराड, खासदार राजन विचारे, आंध्र प्रदेश येथील खासदार श्रीमती चिंता अनुराधा, खासदार डॉ रमेश चंद बिंड (उप्र) व गिरीश चंद्र (उप्र), डॉ भारतीबेन धिरुभाई शियाल (गुजरात), अजय टामटा (उत्तराखंड), श्रीमती कांता कर्दम (राज्यसभा), कनकमेडला रविंद्रकुमार (राज्यसभा) आणि ए विजयकुमार (राज्यसभा) यावेळी उपस्थित होते.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143