fbpx
images 1 पीएफ ला आधार कार्डला लिंक नसेल तर प्रॉव्हिडंट फंड बंद होणार
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नवी दिल्ली- कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं आपल्या EPFO खात्याशी आधार लिंक करणं बंधनकारक केलं आहे. जर कोणी खातेधारक आधार लिंक करणार नाही तर त्याला आता प्रॉव्हिडंट फंड मिळणार नाही. हा नियम 1 जूनपासून लागू करण्यात आला आहे.  आपल्या EPFO खात्याशी आधार लिंक केलं नसेल तर ECR (Electronic Challan cum Return) दाखल होणार नाही, त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला त्याचा प्रॉव्हिडंट फंड मिळणार नाही. सर्व पीएफ धारकांचे खाते युएएन (UAN) सोबत व्हेरिफाईड होणं अत्यावश्यक आहे.

अशा पद्धतीने आपल्या EPFO खात्याशी करा आधार लिंक 

 • सर्व प्रथम  EPFO पोर्टल epfindia.gov.in यावर भेट द्या.
 • epfindia.gov.in वर लॉगइन करा.
 • Online Services ऑप्शन मध्ये  e-KYC portal या ठिकाण जा आणि  Link UAN Aadhaar यावर क्लिक करा.
 • UAN नंबर आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाका.
 • EPFO च्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. 
 • तो ओटीपी नंबर आणि आपला 12 अंकी आधार नंबर नोंद करा.
 • त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा.
 • हे झाल्यानंतर OTP Verification  या पर्यायावर क्लिक करा.
 • आधारच्या व्हेरिफिकेशनसाठी आपल्या आधार नंबरवर असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी नोंद करा. 
  त्यानंतर आपले EPFO खातं आधारशी लिंक होईल. 

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update