Crime Maharashtra

सावत्र मुलीने शारीरिक-मानसिक जाचाला कंटाळून केली वडिलाची हत्या

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नागपूर- सततच्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून नागपूरमध्ये एका सावत्र मुलीने आपल्या वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हिंगणा तालुक्यातील सावळी गावात ही घटना घडली. ज्ञानेश्वर दामाजी गडकर (60) असे मृत इसमाचे नाव आहे. ज्ञानेश्वर गडकर यांच्या सावत्र मुलीने पोलिसांसमोर हत्येची कबुली दिली आहे. ही मुलगी अल्पवयीन आहे. पीडित मुलीने लाकडी दांड्याने ज्ञानेश्वरच्या तोंडावर आणि डोक्यावर वार केले. ज्यामध्ये ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला. सध्या हिंगणा पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

                      ज्ञानेश्वरने 15 वर्षांपूर्वी वंदना नावाच्या महिलेशी लग्न केले होते. वंदनासुद्धा विवाहित होती. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. काही दिवस सावळी येथे एकत्रित राहिल्यानंतर ज्ञानेश्वर वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील खापरी येथे एकटाच राहायला गेला होता. त्यानंतर अधूनमधून तो सावळी येथे वंदनाकडे येत होता. येथे आल्यानंतर तो पत्नी वंदना आणि सावत्र मुलीला सतत त्रास देत असे. सोमवारी सकाळी 11 वाजता ज्ञानेश्वर असाच दारू पिऊन घरी आला. दारूच्या नशेत असलेल्या ज्ञानेश्वरने मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली. यावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी राग अनावर झाल्याने पीडित मुलीने लाकडी दांडक्याने ज्ञानेश्वरच्या तोंडावर आणि डोक्यावर मारा केला. ज्यामध्ये ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com