नागपूर- नागपुरात डॉक्टरीपेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. कोविड सेंटरमध्ये एका डॉक्टराने सहकारी महिला डॉक्टरावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. डॉ. नंदू रहांगडाले असं या डॉक्टराचं नाव आहे. या डॉक्टराने नागपूरच्या कोराडी मार्गावरील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये शारीरिक सुखाची मागणी करुन महिला डॉक्टरावर हॉस्पिटलमध्येच अत्याचाराचा प्रयत्न केला. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी विनयभंगाचा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केलेली आहे.
हे वाचा- आज होणार अंतिम निर्णय; राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता?
नागपूरात मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये कोवीड केअर सेंटर आहे. पीडित 24 वर्षीय महिला डॉक्टर काही दिवसांपूर्वी मेडिकेअरमध्ये कामाला लागली. तेंव्हापासून डॉक्टर नंदू याची वाईट नजर महिला डॉक्टरवर होती आणि सोमवारी रात्री महिला डॉक्टर खोलीत होती. तेव्हा डॉ. नंदू रहांगडाले हा खोलीत आला आणि महिला डॉक्टरला शरीरसुखाची मागणी केली. महिला डॉक्टराने याला नकार दिला. त्यामुळे नंदू याने शिवीगाळ करून महिलेसोबत अश्लील चाळे केले. तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पण प्रसंगवधान राखत महिलेने त्याला धक्का दिला आणि पळ काढला.
हे वाचा- धक्कादायक! या शहरात 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मोफत लस मिळणार नाही
त्यानंतर तातडीने मानकापूर पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून नराधम डॉक्टराला अटक केलेली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.