fbpx
Plan help of Central Government

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई Plan –  केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये राज्याने प्रभावी आणि पथदर्शी भूमिका बजावावीअशी अपेक्षा केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केली. दरम्यानकेंद्र सरकारकडून विविध योजनांच्या पूर्ततेसाठी भरीव सहाय्य मिळत असून, राज्यातील विविध योजना केंद्र सरकारच्या मदतीने पूर्ण करण्यास प्राथमिकता दिली जाईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. वॉर रुमच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशनजल जीवन मिशन यासह विविध योजनांच्या कालमर्यादित आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रातून दर्जेदार गुणवंत खेळाडू घडतील

                  Plan  येथील सह्याद्री अतिथीगृह येथे केंद्रीय मंत्री शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.  पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलग्रामविकास मंत्री गिरीष महाजनकेंद्रीय जल संपदा मंत्रालयाचे सचिव विनी महाजनव्यवस्थापकीय संचालक विकास शीलसहसचिव आनंद मोहनपंकजकुमार, ‘एसपीआरचे आयुक्त ए. एस. गोयलकेंद्रीय जल मंडळाचे चेअरमन सुनील कुमारउपसचिव अरुणकुमार केम्भावीजल आयोगाचे कुशविंदर व्होराविवेक चौधरीआनंद मोहनअरुणकुमारराज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तवपाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव संजीव जयस्वालजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरग्रामविकास विभागाचे सचिव राजेशकुमारकृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेजलजीवन अभियानाचे प्रकल्प संचालक ह्रषिकेश यशोद आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.  

                केंद्रीय मंत्री शेखावत म्हणालेमहाराष्ट्र हे योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यास आघाडीवर असलेले राज्य आहे. Plan  त्यामुळे जलजीवन मिशनस्वच्छ भारत मिशनप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनाअटल भूजल योजना आदी योजनांची राज्यातील अंमलबजावणी गतीने पूर्ण करावीत. जलजीवन अभियानातील कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याकडे लक्ष  द्यावे. केंद्र सरकारने या योजनांसाठी दिलेला निधी विहित वेळेत खर्च होईल आणि योजनांची कामे मार्गी लागतीलयासाठी राज्यस्तरापासून ते अगदी तालुकास्तरावर नियमितपणे आढावा घेण्याची सूचना त्यांनी केली.

%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80 %E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9 1 Plan : केंद्र सरकारच्या मदतीने वेळेत योजना पूर्ण करण्यास प्राथमिकता – मुख्यमंत्री

                    मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कीराज्यामध्ये जल शक्ती मंत्रालयाशी संबंधित राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्प आणि योजनांची अंमलबजावणी गतीने केली जाईल. Plan  केंद्र सरकारकडून राज्याला अधिकाधिक सहकार्य मिळत आहे. राज्य शासन सर्वांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे सामान्य माणसांशी निगडीत असलेल्या स्वच्छ भारत मिशनहर घर जल सारख्या योजना वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Plan  ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेतील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील कामे वेळेत पूर्ण करुन तेथील बळीराजाला दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून पुराचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा अवर्षणप्रवण भागाला लाभ देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प मार्गी लावला जाईल. केंद्र सरकार त्यासाठी सर्वतोपरी सरकार्य करेलअशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी सनियंत्रण कक्ष स्थापणार – उपमुख्यमंत्री

               उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीकेंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने दिलेल्या सूचना उपयुक्त असून त्या दृष्टीने निश्चितपणे कार्यवाही केली जाईल. Plan  महाराष्ट्राने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून खूप चांगले काम केले आहे. जलस्रोत बळकटीकरण चांगल्या प्रकारे झाले. त्या कामाला अधिक वेग दिला जाईल.

               पुराचे वाहून जाणारे पाणी उपयोगात आणण्यासाठी नदी जोड प्रकल्प महत्वाचा आहे. त्यासाठी केंद्राने अधिक मदत करावी. बळीराजा जलसंजीवनी अभियानात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात काम सुरु आहे. या कामाला अधिक गती दिली जाईल. विविध प्रकल्प  वेळेत पूर्ण होण्यासाठी वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे. Plan कामे वेळेत पूर्ण होण्याला प्राधान्य असून सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य पातळीवर सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येईल. स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राज्यात राबविण्यात येईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80 %E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9 2 Plan : केंद्र सरकारच्या मदतीने वेळेत योजना पूर्ण करण्यास प्राथमिकता – मुख्यमंत्री

                    यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव संजीव  जयस्वालजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सादरीकरणाद्वारे विविध योजनांची सद्यस्थितीअंमलबजावणी आदींची माहिती दिली.  

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143 

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update