fbpx
WhatsApp Image 2022 02 09 at 20.22.44 Crime : रूपाभवानी मंदिर चौक ते जुना तुळजापूर नाका दरम्यान पिस्तुल व चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा जोडभावीपेठ पोलीसांनी केला पर्दाफाश

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

अश्या प्रकारचे बेकायदेशीर कृत्याला बळी पडलेल्यानी माहिती देण्याचे आव्हान

सोलापूर Crime- जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, काही इसम जुना तुळजापुर नाका ते रुपा भवानी मंदिर दरम्यान रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्यांच्या जवळील पिस्तुलाचा धाक दाखवुन लोकांना मारहाण व लुटमार करीत आहेत. अशी बातमी मिळाली असता सदरबाबत मा. पोनि / विजयालक्ष्मी कुर्री यांना माहिती देऊन गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांसह रुपा भवानी मंदिराकडुन जुना तुळजापुर नाकाकडे जाणाऱ्या सर्विस रोडच्या कोपऱ्यावर सापळा रचुन इसम नामे सागर अरुण कांबळे वय २२ वर्ष व्यवसाय मजुरी रा.न्यु बुधवार पेठ, भिम विजय चौक, सोलापुर २) बुध्दभुषन नागसेन नागटिळक, वय २६ वर्ष व्यवसाय मंडप व्यवसाय रा. घर नं. ४१/१८३ न्यु बुधवार पेठ, आंबेडकर उद्यानजवळ सोलापुर ३) सतीश ऊर्फ बाबुला अर्जुन गायकवाड वय २५ वर्ष व्यवसाय – ड्रायव्हर रा.घर नं. १२६ मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापुर ४) अक्षय प्रकाश थोरात वय २६ वर्ष व्यवसाय ड्रायव्हर, रा. ४८/८, मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, न्यु बुधवार पेठ, विश्वदीप चौक, सोलापुर यांना ताब्यात घेतले.

                त्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात एक गावठी पिस्तुल, एक धारधार गुप्ती, चार मोबाईल फोन व दोन मोटारसायकल मिळुन आले. मिळालेल्या मोबाईल व्हि. डी. ओ. ची दोन पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये वरील इसम हे त्यांच्याकडील गावठी पिस्तुलचा व धारधार गुप्तीचा रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना धाक दाखवुन त्यांची आडवणुक करुन त्यांना मारहाण व दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांना विवस्त्र करून, त्यांना हस्तमैथुन व अनैसर्गिक संभोक करण्यास भाग पाडुन त्यांना शेण खाऊ घालण्यास भाग पाडुन अश्लिल कृत्य करण्यास भाग पाडुन त्यांचे मोबाईलमध्ये व्हि.डी.ओ. रेकॉडर्डींग करुन ते आपापसात व्हॉट्सअॅपमध्ये प्रसारीत केल्याचे दिसुन आले.. त्यामुळे नमुद चार इसमांविरुध्द जोडभावी पे पोलीस ठाणे गु.र.नं.५८/२०२२ भा.द.वि. कलम २९२,५०६ (२), भारतीय हत्यार कायदा कलम ३,४,२५ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास पोनि / विजयालक्ष्मी कुर्री हे करीत आहेत. समस्त नागरीकांना आव्हान करण्यात येते की, वरील अटक आरोपींनी अश्या प्रकारचे बेकायदेशीर कृत्य केले असल्याबाबत माहिती असल्यास जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापुर शहर येथे संपर्क साधावा असे आव्हान केले आहे. सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त हरीष बैजल, मा.पोलीस उप-आयुक्त (परीमंडळ), डॉ. वैशाली कडुकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, विभाग १, डॉ. संतोष गायकवाड, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाळासाहेब भालचिम, पोनि/ विजयालक्ष्मी कुरी (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक केतन मांजरे, पोह/१११६ आबा थोरात, पोना/६२८ सुरेश जमादार, पोना / १२७४ अतुल गवळी, पोना/ १६८५ खाजप्पा आरेनवरु, पोकॉ/१५३३ थिटे, पोकॉ/१६९ राजेश घोडके, पोकॉ/६१३ स्वप्निल कसगावडे, पोकॉ/१५६४ गोपाळ शेळके, पोकॉ/१५०४ दत्ता काटे, पोकॉ/१५७१ बाळु माने, पोकॉ/१५४५ वेळळे, पोकॉ/१९९७ नागटिळक, पोकॉ/१४८८ सुहास गायकवाड यांनी बजावली आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update