Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई Recruitment- पोलीस भरतीत सहभागी झालेल्या उमेदवाराला धावण्यामध्ये जास्त गुण मिळवून देण्यासाठी मदत करणे दोघा महिला अंमलदारांना भारी पडले आहे. त्या दोघींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस शिपाई भरती प्रक्रियेअंतर्गत घाटकोपर रेल्वे पोलीस मुख्यालयात मैदानी चाचणी घेण्यात आली. 16 डिसेंबर रोजी सशस्त्र्ा पोलीस नायगाव येथे कार्यरत असलेल्या शबनम इनामदार या 100 मीटर धावणे इव्हेंटमध्ये वॉचर म्हणून तर परवीन शेख यांची 1600 मीटर धावणे इव्हेंटमध्ये वॉचर म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
फेब्रुवारीमध्ये म्हाडा भरती परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार
Recruitment या दोघी अंमलदारांनी उमेदवार राम घोडके याला जास्त गुण मिळवून देण्यास मदत केली. हा प्रकार लक्षात येताच याप्रकरणी झालेल्या चौकशीत दोघींनी राम घोडके यास जास्त गुण मिळवून देण्यास मदत केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शबनम इनामदार आणि परवीन शेख या दोघींना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews