fbpx
images 11 Political : देशमुखांनी नवा चेहरा जिल्हा नियोजन समितीत टाकल्याने भाजपात दिग्गजांची नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर

 Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर Political  – (सुनिल कोडगी)- शहरातील दिग्गजां!सह भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावल्यामुळे भाजपात दिग्गजांची आमदारांवर नाराजगी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये इतके ज्येष्ठ अभ्यासू नगरसेवक व पदाधिकारी असताना विजयकुमार देशमुख यांनी नागेश भोगडे सारख्या आणि कोणताच अनुभव नसलेला लहान वयात तिकीट देऊन देखील पुन्हा त्यानांच जिल्हा नियोजन समिती मध्ये घेऊन भाजप मध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ नगरसेवक व पदाधिकारी यांचा अपमान केला आहे अशी चर्चा शहरात दिवसभर पहावयास मिळाली. शहरात भाजपात सक्रिय असलेले प्रभाकर जामगुंडे, नागेश वल्याळ, जगदीश पाटील, भाजपा माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, सुरेश पाटील यांच्यासारखे मत्ताबराना डावलून मार्जितल्या लोकांना पदे देत आहेत. भाजपात आजवर कोणताच अनुभव, पद व पक्षाचे कोणतेच काम आजवर न केलेल्यांची नावे शहर अध्यक्ष व उत्तरचे आमदारांनी कसे काय सुचवले यावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. मनपातील कारभार आजवर कोणाला कळाले नाही. शहर विकासासाठी कोणी प्रयत्न केले नाही. आता जिल्हा नियोजन समिती मध्ये आल्यानंतर कोणती कामे करावयाची असतात त्यातील काडीमात्र ज्ञान नसताना पदे कशी दिली गेली ?

राज्यपाल नियुक्त सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य पदी संजय साळुंखे

political-district-committee

              Political  निवडणुकीच्या वेळेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आंदोलन, बूथ यंत्रणा काम करायचे, गुन्हे दाखल करून घ्यायचे व पद मात्र आपल्या मार्जितल्या ज्याला कोणताच अनुभव नाही त्यांना द्यायचं. Political  ज्याने संघटनेचे कोणतेच काम केले नाही अशा लहान मुलाला द्यायचे हा खर तर कार्यकर्त्यांचा अपमान असून याचा सुरेश पाटलांनी सोशल मीडियावर नाराजगी व्यक्त केली आहे. मंगळवारी जिल्हानियोजन समितीची यादी जाहीर होताच भाजपातील गटबाजी व नाराजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. आता आगामी काळात भाजपात खिंड पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुकीच्या वेळेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आंदोलन, बूथ यंत्रणा काम करायचे, गुन्हे दाखल करून घ्यायचे व पद मात्र आपल्या मार्जितल्या ज्याला कोणताच अनुभव नाही त्यांना द्यायचं. ज्याने संघटनेचे कोणतेच काम केले नाही अशा लहान मुलाला द्यायचे हा खर तर कार्यकर्त्यांचा अपमान असून याचा सुरेश पाटलांनी सोशल मीडियावर नाराजगी व्यक्त केली आहे.
#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

Corona Live Update