Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर Political – होटगी रोड विमानतळ परिसरातील शांतीनगर येथील श्री श्री श्री सद्गुरु बसवारुढ महास्वामीजी मठ ट्रस्टच्या वतीने सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे नूतन शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि सोलापूर महानगरपालिकेचे संदीप कारंजे यांची अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती झाल्या निमित्त मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद अप्पाजी आणि मठाधिपती श्री शिवपुत्र अप्पाजी यांच्या दिव्य सानिध्यात माजी सभागृह नेते सुरेश पाटील, मनपा माजी गटनेते आनंद चंदनशिवे, किसन जाधव, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रवीण निकाळजे, रफिक इनामदार,बिपिन पाटील, चेतन गायकवाड, एम के फाउंडेशनचे नागेंद्र कोगणुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा आशीर्वादपर शाल पुष्पमाला घालून करून सन्मान करण्यात आला.
‘जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी 5 लाखांची मदत -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Political दरम्यान लहानपणापासूनच श्री सद्गुरु बसवारूढ मठ येथे आपण येत आहोत. श्री सद्गुरु बसवारूढ मठावर आपली अफाट श्रद्धा आणि निष्ठा आहे अप्पाजींचे सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यानेच आपण या पदापर्यंत पोहोचले आहे भविष्यात देखील जनकल्याणाच्या हितासाठी कार्य करण्यासाठी अप्पाजींचे सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी राहणार असल्याचे मनोगत यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी व्यक्त केलं. हा माझ्यासाठी सुवर्णयोग म्हणावा लागेल हा योग माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी घडवून आणला श्री सद्गुरु बसवारुढ मठाच्या आणि आपाजींच्या कृपा आशीर्वादाने भविष्यात आपल्याला कार्य करण्यासाठी नवउर्जा आणि प्रेरणा मिळालं असल्याचं मनोगत यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे नूतन अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी व्यक्त केलं.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143