Politician: Suresh Patil corporator
Politician Solapur City

Politician : प्रभागाच्या विकासासाठी निधी खेचून आणणारा एकमेव नगरसेवक म्हणजे सुरेश पाटील; आमदार देशमुखांनी केले कौतुक

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

प्रभाग क्रमांक 3 मध्ये नगरसेवक सुरेश पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन रस्त्याचे शुभारंभ

सोलापूर Politician – स्व. गोपीनाथ मुंडे यांचा जयंती आणि स्व. प्रकाश मारता यांयांच्या पुण्यतिथी निमित्त इंदिरा वसाहत मच्छा बोळ मेंगजी घर आणि मैसम्मा मंदिर ते यल्लमा निवास बिद्री घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करण्याची शुभारंभ शहर उत्तर चे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रभाग क्रमांक 3 मध्ये नगरसेवक सुरेश पाटील यांचा पाठ पुरवठ्यामुळे प्रभाग क्रमांक तीनचे कायापालट होत असलेला दिसून येत आहे त्यातलाच एक भाग म्हणून रविवारी डांबरीकरण रस्त्याचे शुभारंभ करण्यात आले.

            Politician सोलापूर शहराला भाजप पक्षात असलेल्या प्रत्येक माणसाला नावानिशी ओळखत असलेले स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आणि कै. प्रकाश मारता यांच्या पुण्यतिथीनिमित्त इंदिरा वसाहत मच्छा बोळ मेंगजी घर आणि मैसम्मा मंदिर ते यालम्मा निवास बिद्री घरापर्यंत 9 लाख 40 हजार रुपयांचा डांबरीकरण रस्ता चे शुभारंभ शहर उत्तर चे आमदार विजयकुमार देशमुख यांचा अध्यक्षतेखाली आणि शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचा सुरुवातीला स्व. गोपीनाथ मुंढे आणि स्व. प्रकाश मारता यांचा प्रतिमेला मान्यवरांचा हस्ते पुष्पहार अर्पण द्वीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. या डांबरीकरण रस्ता शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, रुद्रेश बोरामणी, शशिकांत थोरात, बिज्जू प्रधाने, कनकय्या कोडूर, सुरेश बिद्री आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

हे वाचा – 25 हजाराची लाच घेताना तहसीलदारास रंगेहाथ अटक

           या कार्यक्रमाचे प्रस्तावनात सोलापूर शहरात सर्वत्र ठिकाणी कोरोना लसीकरण चालू आहे. मात्र प्रभाग क्रमांक 3 मध्ये नगरसेवक सुरेश पाटील यांनी ठेवलेल्या कोरोना लसीकरण Politician सोलापूर शहरातला सर्वात जास्त आमचा प्रभाग क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे Politician  असे प्रस्तावना मध्ये बिपिन पाटील यांनी सांगीतले. यावेळी नगरसेवक सुरेश पाटील यांनी म्हणाले की मला विषबाधा झाल्यापासून दोन वर्षे हॉस्पिटल नऊ महिने घरात असल्याने प्रभागाचा विकासात खंडित झाला होता. मात्र सहा महिन्यापूर्वी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बूथ पे चर्चा असे कार्यक्रम घेऊन त्यामध्ये प्रभागात असलेले सर्व अडचणी नागरिकांनी मांडलेले होते.

           नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नाचा उत्तर देत म्हणाले होतो की येत्या काही दिवसातच प्रभागात सर्वत्र ठिकाणी रोड, ड्रेनेज, दिवाबत्ती Politician आणि कचऱ्याची समस्या दूर होणार Politician  असल्याचे बूथ पे चर्चांमध्ये सांगितलो होतो मी सांगितल्याप्रमाणे रविवारी डांबरी रस्त्याचे शुभारंभ करण्यात आलेला आहे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो असे नगरसेवक सुरेश पाटील यांनी त्यांच्या भाषणात म्हणाले.

Solapur city news 2 1

          शहर उत्तर चे आमदार विजयकुमार देशमुख यांनी नगरसेवक सुरेश पाटील यांच्यासारखे 5 टर्म 25 वर्षांपासून पासून त्यांनी नगरसेवक आहेत त्यांना कशा प्रकारे काम करून घ्यायचा आहे ते त्यांना चांगलेच माहीत आहे, त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहेत आणि कुठले निधी कशाप्रकारे आणता हे फक्त सुरेश अण्णालाच माहित आहे. त्यांच्या शिवाय कोणीच जास्त निधी आणू शकत नाही आणि प्रभागात विकास होण्यासाठी माझा निधी सुद्धा देतो असे आमदार विजयकुमार देशमुख यांनी म्हणाले.

            कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला. आणि कोरोना वक्सिनची लस घेतलेल्या प्रत्येक नागरीकांना मोफत कोरोना सर्टिफिकेट लॅमिनेशन करून देत असल्याचेही त्या ठिकाणी दिसून आले. याप्रसंगी श्रीनिवास कनकी ,राम मड्डी , अजय उदगिरी, अशोक मच्छा, श्रीनिवास पोतन, रमेश द्यावरकोंडा, दत्ता बत्तुल, किरण वल्लाल, सदानंद दासरी, नरेंद्र यंगल, श्रीकांत मेंगजी, आनंद श्रीराम, श्रीनिवास बिज्जा, गजराज जितुरी, श्रीनिवास कणकी, पवन इंजामुरे, मधुकर गाजुल, अॅड. अंबादास रायनी,चंद्रकांत कंदिकटला, लक्ष्मीकांत दुस्सा, राजु उसाकोयल, मोहन तुरूप, जयराज जितुरी आदी प्रभाग क्रमांक 3 मध्ये नागरिक महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मल्लिकार्जुन चोपडे तर आभार बिपीन पाटील यांनी मानले.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews