fbpx
pollution-running-on-ethanol-fuel

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

महाराष्ट्र Pollution- देशात दिवसागणिक पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे. परंतु आता पेट्रोल आणि डिझेलची गरज लवकरच संपणार आहे. कारण पेट्रोल-डिझेलऐवजी इथेनॉलवर आता गाड्या धावणार आहेत. सरकराने कार कंपन्यांना यासाठी तयारी करण्यास सांगितले असून याबाबत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे. सरकारने फ्लेक्स इंजिन असलेल्या वाहनांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं आहे. यामध्ये वाहन कंपन्यांना सहा महिन्यांत फ्लेक्स फ्लुएल इंजिन असलेली वाहने बाजारात आणण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

सोलापूरच्या विविध प्रश्नांवर खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींची पंतप्रधान मोदींशी चर्चा

           Pollution फ्लेक्स इंजिन सुरू केल्यामुळे १०० टक्के इथेनॉलवर ही वाहने चावलणे शक्य होणार आहे. देशातील अनेक भागांत डिझेल आणि पेट्रोलचे दर १०० च्या पुढे गेले आहेत. इथेनॉलची किंमत सध्या ६३.४५ रूपये प्रतिलिटर आहे. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत इथेनॉल ४० रूपयांनी स्वस्त आहे. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत इथेनॉल ५० टक्के कमी प्रदूषण Pollution पसरवते.

फ्लेक्स इंधन इंजिन असलेली वाहने सादर करण्यास संमती

दरम्यान, काही कंपन्यांनी फ्लेक्स इंधन इंजिनसह वाहने तयार करण्यास सुरूवात केली आहे. तर अनेक कंपन्यांनी देखील ते स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे. टीव्हीएस या कंपनीने २०१९ मध्ये भारतात प्रथमच फ्लेक्स इंजिन इंधन सादर केले होते. तसेच टोयोटो, मारूती सुझुकी आणि ह्यंदाई यांसारख्या कंपन्यांना फ्लेक्स इंधन इंजिन असलेली वाहने सादर करण्यास संमती देण्यात आली आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update