Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
मुंबई train – मुंबईत कोरोना आणि ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढत चालल्याने मुंबईतील लोकलच्या गर्दीवर चाप लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, हे निर्बंध कसे असतील या बाबतची अधिकृत माहिती देण्यात आली नसून लोकलबाबतच्या निर्बंधांची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. काल बुधवारी मुंबईत एकूण १५ हजार १६६ रुग्ण आढळून आल्याने लोकल प्रवासावर राज्य सरकार निर्बंध लावणार का याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष आहे. अनेक प्रवासी हे कामानिमित्त मुंबईकडे जात असतात. त्यामुळे वाढत्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता वर्तवली जाते.
याच आधारावर मुंबईत रेल्वेने प्रवास करण्यासाठी निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचं बोललं जात आहे. या संबंधातील वृत्त Tv9 मराठी या वृत्तसमुहाने दिलं आहे. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे रूग्णालयात संक्रमित लोकांची संख्या वाढत आहे. पश्चिम रेल्वेचे जगजीवन राम रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. सध्या या रुग्णालयात ५१ जणांवर उपचार सुरू आहेत. जानेवारीमध्ये ४६ जणांना दाखल करण्यात आले. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ज्यांना जास्त लक्षणे दिसत आहेत त्यांनाच प्रवेश दिला जात आहे.
भवानी पेठेतील किरण कंटीकर तरुणाची मोठी भरारी; सामाजिक संघटनेच्या वतीने कौतुकांचे वर्षाव
मागील आठवड्यात बोरिवली येथे एक Train बुकिंग क्लर्क पॉझिटिव्ह आढळला होता. त्याचप्रमाणे बुधवारी मध्य रेल्वेत एक अधिकारी ड्युटीवर असताना पॉझिटिव्ह आढळून आला. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे रूग्णालयात संक्रमित लोकांची संख्या वाढत आहे. पश्चिम रेल्वेचे जगजीवन राम रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. सध्या या रुग्णालयात ५१ जणांवर उपचार सुरू आहेत. जानेवारीमध्ये ४६ जणांना दाखल करण्यात आले. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ज्यांना जास्त लक्षणे दिसत आहेत त्यांनाच प्रवेश दिला जात आहे. दरम्यान, लोकलमधील Train गर्दीमुळे संसर्ग वेगाने पसरण्याची शक्यता आहे. अशावेळी लोकलमधील गर्दी नियंत्रणासाठी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुभा, गर्दीच्या वेळा वगळून प्रवास करण्याची मुभा, हे आणि अन्य निर्बंध लागू करावेत. एसटी संप, रिक्षा-टॅक्सी मीटर भाडेवाढ आणि वाहतूककोंडी यामुळे लोकलबंदी लागू झाल्यास त्याला रेल्वे प्रवासी संघटनांचा कडाडून विरोध असेल, असे रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews