Solapur City News 55
Electricity

शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडल्यास अधिकाऱ्यावर हल्लाबोल करू

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

आ. सुभाष देशमुख इशारा

सोलापूर- राज्य सरकारने शेतकऱ्यांना अवाच्या सव्वा बिले पाठवली आहेत आणि ती न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याचा धडाका लावलेला आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. कोरोनानंतर आता कुठे शेतकरी सावरला जात आहे मात्र हेही सरकारला पाहवत नाही. ज्या शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले आहे ते त्वरित जोडावे. यापुढे जर शेतकऱ्यांचे कनेक्शन कोणी तोडण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. वेळप्रसंगी त्यांच्यावर हल्लाही करण्यात येईल, याला जबाबदार सरकार असेल, असे रोख ठोक प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले. सरकारच्या अन्यायकारक वीज तोडणीच्या विरोधात जुनी मिल कंपाऊंड येथे भाजपच्यावतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले होते, त्यावेळी आमदार देशमुख बोलत होते. ते पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यांच्या सरकारमधील दुसऱ्या ऊर्जा मंत्र्यांनी अधिवेशन संपल्यावर लगेच वीज तोडणी करा, असे सांगितले त्यामुळे या सरकारमध्ये ताळमेळ नाही. हे सरकार दिशाभूल करणारे सरकार आहे. लॉकडाऊच्या काळात शेतकर्‍यांना भरमसाठ मोठी वीज बिले पाठवण्यात आली आहेत. अगोदर महावितरणने ती वीज बिले दुरूस्त करून पाठवावीत. तोपर्यंत शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडू नये. अधिच कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. अशात वीज तोडणे म्हणजे शेतकर्‍यांच्या हातून पुढचा हंगामही काढून घेण्यासारखे आहे. सध्या उन्हाळ्याचा हंगाम आहे अशा परिस्थितीत जर वीज कनेक्शन तोडले शेतीचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. कोरोना काळात महावितरणने भलीमोठी वीज बिले पाठवली आहेत. ती दुरूस्त करून पाठवावीत. तोपर्यंत एकाही शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडू नये, ज्यांची वीज तोडलेली आहे ती पुन्हा जोडावी अशी आमची मागणी आहे. तर कोणी शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न केला तर संबंधित अधिकाऱ्यांवर भाजपचे कार्यकर्ते हल्लाबोल करती. याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार राहणार आहे असा इशाराही आमदार देशमुख यांनी दिला. यावेळी दक्षिणचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, उत्तरचे तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, महेश देवकर, भीमराव कुंभार, श्रीनिवास करली, आप्पासाहेब पाटील, यतिन शहा, महादेव कमळे, आण्णराव बाराचारी, शशी थोरात, सुनिल गुंड, आनंद बिराजदार, श्रीमंत बंडगर, , श्रीनिवास पूरूड़, श्रीकांत ताकमोगे, अतुल गायकवाड, भारत जाधव, अमोल गायकवाड, प्रथमेश कोरे , अक्षय अंजीखाने, व भाजपा कार्यकते उपस्थित होते. चौकट
आ. देशमुख यांच्या चालकाला एक लाख 69 हजारांचे बिल
यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले की माझ्या गाडीच्या चालकाकडे शेती नाही, शेती पंपही नाही तरी त्याला एक लाख 69 हजार यांचे बिल पाठवण्यात आलेले आहेत आणि त्यामधून सबसिडी भाविक असे म्हटले आहे म्हणजे ज्याच्याकडे शेती नाही त्याला भरमसाठ बिल दिले देऊन सबसिडी देण्यात येत आहे तर ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना हजाराचे बिल लाखोवर देऊन केवळ खिसे भरण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. असा आरोपही आमदार देशमुख यांनी केला.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143