Solapur City

सोलापूरची वैशिष्ट्ये आधुनिक रूपात सादर करा- राहुल सोलापूरकर

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापूरचा पर्यटक विकास घडवण्यासाठी सोलापूरची सारी वैशिष्ट्ये आधुनिक रूपामध्ये जगासमोर सादर केली पाहिजेत असे मत नामवंत नाट्य-चित्र कलावंत आणि सोलापूर सोशल फाउंडेशनचे ब्रँड ॲम्बेसिडर राहुल सोलापूरकर यांनी सोमवारी सोलापुरात बोलताना व्यक्त केले.
                 सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर ब्रँडिंग व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफताना सोलापूरकर बोलत होते. सोलापूरच्या इतिहासाच्या पाऊल खुणा आणि सोलापूरच्या भविष्याचा वेध असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. राहुल सोलापूरकर यांनी सोलापूर मधील वृत्तपत्रांची परंपरा, ऐतिहासिक परंपरा त्याचबरोबर विविध क्षेत्रातील सोलापुर ची वैशिष्ट्ये यांचा आढावा घेतला. सोलापूर मध्ये वैशिष्टे खूप आहेत परंतु ती आधुनिक पद्धतीने पर्यटकांच्या समोर ठेवली पाहिजेत. सोलापूरच्या विविध हॉटेल आणि लॉज मध्ये किंवा जेवणाच्या निमित्ताने येणाऱ्या प्रत्येक परगावच्या ग्राहकाच्या हातात सोलापूरचा तीन ते चार दिवसांचा पर्यटन कार्यक्रम काय असू शकतो याचे छोटेसे पत्रक दिले पाहिजे तरच त्यांच्या मनामध्ये सोलापूर मध्ये फिरून प्रेक्षणीय स्थळे बघण्याची उत्सुकता निर्माण होईल असे सोलापूरकर यांनी सांगितले. श्री राहुल सोलापूरकर यांनी सामान्य सोलापूरकरांना माहित सुद्धा नसतील अशी सोलापूरची अनेक वैशिष्ट्ये विस्ताराने सांगितली. सोलापूर रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यातील प्रवाशांना सोलापूरचे खास जेवण पुरवण्याची सोय केली तर त्या प्रवाशांबरोबर आणि त्या गाड्या बरोबर सोलापूरची खाद्यसंस्कृती पूर्ण भारतभर पसरेल असे ते म्हणाले. सोलापूरचे ब्रँडिंग होऊ शकते परंतु त्यासाठी कोणीतरी वाहून घ्यावे लागेल असे त्यांनी प्रतिपादन केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com