Economy

कोविड विषयक समस्यांसाठी मनसेच्या वतीने २४ तास मदत कक्ष

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

ठाणे –  कोविड विषयक समस्यांसाठी मनसेच्या वतीने २४ तास मदत-कक्ष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ठाण्यातील घंटाळी येथील मनसे मध्यवर्ती कार्यालय येथे।मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेकरांच्या कोविड विषयक समस्यांसाठी 24 तास मदत कक्ष सुरु करण्यांत आले आहे.या मदत कक्षाच्या माध्यमातून ऍम्ब्युलन्स , बेड , जेवण व्यवस्था आणि इतरही काही अडचणी असल्यास त्या सोडवण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. याचे उदघाटन प्रसंगी मनसेचे नेते अभिजित पानसे, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव,शहराध्यक्ष रविंद्र मोरे,महिला अध्यक्षा समीक्षा मार्कंडे,विद्यार्थी सेना अध्यक्ष अरुण घोसाळकर,वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष संदीप साळुंके, आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते. सध्या ठाणे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कोरोना बाधित रुगणांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत ही बाब लक्ष घेऊन रुग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी मनसेने मदत केंद्र सुरू केल्याने मनसेच्या उपक्रमाचे कौतुक होते आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143