Maharashtra Gov National

अणुऊर्जेवर आधारित नाशवंत शेतीमालावर प्रक्रिया करणारा पकल्प क्रांतिकारी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

शिर्डी-  अणुऊर्जेवर आधारित कृषी मालावर प्रक्रिया करणारा हिन्दुस्थान अॅग्रो कोऑपरेटिव्ह सोसायटीचा भारतामधील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये विकीकरणातून कृषी व कृषिपूरक मालावर प्रक्रिया करण्यात येत आहे. यामुळे नाशवंत शेतीमालाचे जतन करून बाजारात योग्य भाव मिळाल्यावर शेतकऱ्याला तो विकता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडून येणार असल्याने  हा प्रकल्प क्रांतिकारक आहे, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे केले. हिन्दुस्थान अॅग्रो को ऑपरेटीव्ह सोसायटीच्या राहूरी तालुक्यातील अणुशक्तीनगर, वरवंडी येथील प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर उपस्थितांशी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुजय विखे, संस्थेचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) राजेंद्र निंभोरकर, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भारत ढोकणे, डॉ.नामदेव ढोकणे, विनायक देशमुख, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार फसीयोद्दीन शेख उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, हा प्रकल्प पाहण्याची माझी खुप दिवसांची इच्छा होती. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे असे आधुनिक प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. आज प्रकल्पाची पाहणी केली आणि प्रकल्पाची उभारणी उच्च दर्जाची झाली आहे असे सांगितले. एमआरटीपी कायद्यातील तरतुदी आणि विद्युत जोडणीसंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. प्रकल्पाच्या विस्तारीकरणास शुभेच्छा देऊन लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा सैन्यातील सेवेचा अनुभव प्रकल्पाच्या प्रगतीसाठी उपयोगी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली. खासदार सुजय विखे यांनी प्रकल्पाच्या उभारणीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.  जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी विस्तारीकरणास आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. प्रकल्पाला उत्तुंग यश लाभो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी प्रकल्प उभारणीची माहिती दिली प्रकल्पातील उत्पादनांचा शेतकऱ्यांपासून ते सैनिकांपर्यंत सर्वांना फायदा होणार असल्याची माहिती दिली. रशियन संस्थेसोबत देशात आणि परदेशात नाशवंत शेतीमालावर पक्रिया करणारे वीस विकीरण प्रक्रिया प्रकल्प उभारणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाला प्रकल्पाचे संचालक, सभासद, तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143