images 2 2
Electricity

ऊर्जा विभागाच्या वीज कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना त्वरित सामावून घेण्याच्या प्रक्रियेस गती द्या

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई– राज्यातील औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासंदर्भात महापारेषण, महावितरण आणि महानिर्मितीच्या संपूर्ण रिक्त जागांसाठी विशेष जाहिरात देण्यात यावी व नियमाप्रमाणे त्यांना सेवेत सामावून घेण्यात यावे, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या फोर्ट येथील कार्यालयात चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, ‘महानिर्मिती’चे मुख्य व्यवस्थापकिय संचालक संजय खंदारे, आमदार प्रतिभा धानोरकर, महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती प्रगतकुशल कृती समितीचे सभासद उपस्थित होते.

                  ऊर्जामंत्री डॉ.राऊत म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्तांपैकी जे कुशल प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांना करार पद्धतीने प्राधान्याने सेवेत घेण्यात यावे व करार पद्धतीच्या अंतर्गत मिळत असलेले मानधन देण्यात यावे. याचबरोबर कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी विशेष जाहिरात देऊन पुढील प्रक्रियेस गती द्यावी. प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ नये यासाठी दहावी तसेच बारावी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना परिक्षेसाठी विशेष प्रशिक्षण द्यावे अथवा त्यांच्या शालांत पात्रतेनुसार परीक्षेचे निकष तयार करण्यात यावे, असे डॉ.राऊत यांनी सांगितले.

                     ज्या शेतकऱ्यांची चोवीस तास वीज पुरवठ्याची मागणी आहे, ते शेतकरी थकबाकीची अर्धी रक्कम अदा करून नव्या दराप्रमाणे पुढील वीज देयक अदा करण्यास तयार असतील अशा शेतकऱ्यांना तातडीने दिवसा वीज जोडणी देण्यात यावी, असे निर्देशही मंत्री डॉ.राऊत यांनी दिले.

#solapurcitynews

जाहिरात–

126904272 1765867386911009 7423974680860265992 nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
📷 विवाह दिनांक – 27 डिसेंबर 2020
📷 स्थळ – हरिभाई देवकरण,प्रशाला प्रांगण , सोलापूर
सोलापूर येथे आयोजित केला आहे. तरी ईच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावा.
संपर्क – लोकमंगल फौंडेशन 13 अ , सह्याद्री नगर , विकास नगर ,जुना होटगी नाका , सोलापूर
नाव नोंदणी अंतिम तारीख –
20 डिसेंबर 2020
फोन नं – (0217) 232240
मो – 9657709710
Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com