fbpx
download 1 2 कृषी व पर्यावरणाच्या जपणुकीसाठी मृदसंवर्धन लोकचळवळीत सहभागी व्हावे
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

अमरावती- मृदेचे कृषी क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असून, कृषी व पर्यावरणाच्या जपणुकीसाठी मृदसंवर्धन ही लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले. जागतिक मृदा दिनानिमित्त कार्यक्रम तालुका बीज गुणन केंद्र,धानोरा गुरव (ता नांदगाव खंडेश्वर) येथे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.  दर्यापूरचे आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विभागीय कृषी सहसंचालक शंकरराव तोटावार, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे , किटकशास्त्रज्ञ पी. सिंग,  अनिल ठाकूर, अनिल खर्चान ,श्रीमती प्रीती रोडगे,उपविभागीय कृषी अधिकारी,राहुल माने आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मृदसंवर्धन दिन हा केवळ औचित्य म्हणून साजरा न करता त्याची लोकचळवळ झाली पाहिजे. रासायनिक खतांचा संतुलित वापर व सेंद्रिय शेतीपद्धतीचे संवर्धन होणे आवश्यक आहे. कृषी विभागाने गावोगाव प्रचार व प्रसार करून शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले .

               गावातील व परिसरातील प्रगतीशील शेतकरी व महिला गटाच्या शेतकरी सदस्या  उपस्थित होत्या.  मृद तपासणी व जमीन आरोग्य पत्रिका बाबत घडीपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर झालेल्या कार्यशाळेत कृषी शास्त्रज्ञांनी  शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय चवाळे यांनी, सूत्रसंचालन सीमा देशमुख यांनी केले. प्रीती रोडगे यांनी आभार मानले .

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM कृषी व पर्यावरणाच्या जपणुकीसाठी मृदसंवर्धन लोकचळवळीत सहभागी व्हावेडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update