Crime Maharashtra Solapur City

शहरात नियम मोडणाऱ्यां विरुद्ध दंडात्मक कारवाई; आवश्यक असल्यास बाहेर पडण्याचे पोलीस आयुक्तांकडून आवाहन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- दिवसेंदिवस शहरात रुग्णसंख्या वाढत असताना नागरिकांनी नियम तोडून बाहेर फिरत कोरोना संसर्गजन्य नियम मोडत असल्याने सोलापूर शहरात कोरोना रोगाच्या अनुषंगाने शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यां विरोधात सोलापूर शहर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आले. सोलापूर शहर हद्दीमध्ये दिनांक मंगळवारी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आस्थापना व सार्वजनिक ठिकाणी तसेच वाहतुकीच्या ठिकाणी मास्क न लावलेल्या नागरिकांविरोधात प्रतिबंधात्मक व दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी सार्वजनिक ठिकाणी व सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी मास्क न लावलेल्या नागरिकांनी विरुद्ध एकूण 150 जणांकडून 75000 रु दंडाची रक्कम व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना 10 जणांवर 20000रु व शहर वाहतूक शाखा यांच्या कडील दंडात्मक कारवाई व आकारण्यात आलल्या एकूण 6 जणांवर दंडाची रक्कम 3000 रु दंड लावून कारवाई करण्यात आले. सदर प्रतिबंधात्मक कारवाई ही मा. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा बापू बांगर, पोलिस उपायुक्त परिमंडळ डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त मुख्यालय डॉ. दिपाली घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर शहर वाहतूक शाखा सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी तसेच नियंत्रण कक्ष कडे नियंत्रण कक्ष अधिकारी यांनी सक्षम पणे सदर कारवाई केली आहे. कोरोना विरुद्ध लढाईमध्ये सर्व नागरिकांनी पूर्ण संसर्गावर निर्बंध आणण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. तसेच घराबाहेर पडताना तोंडाला मास्क व सामाजिक अंतर तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com