Food Maharashtra

जिल्ह्यातील लाभार्थींना मिळेल १ लाख ३० हजार क्विंटल गहू, तांदूळ मोफत

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- राज्य शासनाने लॉकडाऊन काळात अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना मोफत गहू व तांदूळ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोलापूर शहर व जिल्ह्यातील अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना १ लाख ३० हजार क्विंटल धान्य मोफत दिले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात अंत्योदय योजनेतील ६१ हजार २०२ कुटुंबांना १५,३०० क्विंटल गहू तर ६,१२० क्विंटल तांदूळ दिले जाणार आहेत. अन्न सुरक्षा योजनेतील ४,५९,२७४ कुटुंबांना ६५,६९६ क्विंटल गहू तर ४३, ७९७ क्विंटल तांदूळ दिले जाणार आहेत. शासनाच्या आदेशानुसार एप्रिल आणि मे महिन्याचे धान्य एकाच वेळी द्यावे असे म्हटले आहे. ज्यांनी एप्रिल महिन्याचे धान्य घेतले आहे त्यांना मे महिन्याचे धान्य मोफत द्यावे. ज्यांनी एप्रिल महिन्याचे धान्य घेतले नाही त्यांना एप्रिल महिन्याचे धान्य मोफत देण्याचे आदेशात नमूद केले आहे.
शहर, जिल्ह्यात आतापर्यंत ७० टक्के लाभार्थींना धान्य वाटप करण्यात आले आहे. यामुळे आता मे महिन्यातील धान्य मोफत देण्यात येणार आहे. धान्य वाटपास सुरुवात करण्याचे आदेश दुकानदारांना देण्यात आल्याची माहिती, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे यांनी सांगितली. लॉकडाऊनमुळे नागरिकांना मदत म्हणून मोफत धान्य देण्यात येणार आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com