Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर Rain –गेल्या काही दिवसापासून सोलापूर शहरात पाऊस सुरू असल्यामुळे शहरात ठीक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने रोडवरील खड्डे दिसत नाहीत ते खड्डे लवकरात लवकर बुजवण्यासाठी सर्व विभागीय अधिकारी यांना महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी सर्व्हे करून ताबडतोब बुजवण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. आज सम्राट चौक, तुळजापूर वेश,जोशी गल्ली ते चिराग अली मंगल कार्यालय रोड तसेच सिविल चौक,कोर्ट समोर या ठिकाणी महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी रस्त्याची पाहणी केली.
Rain यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सहायक अभियंता शांताराम अवताडे, झोन अधिकारी सारिका आकुलवार आदी उपस्थित होते. सोलापूर शहरातील ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्याचे सर्वे करून त्या ठिकाणी विभागीय अधिकारी यांनी मजूर व त्यांच्या कर्मचारी मार्फत काम लवकरात लवकर करून घ्यावे अशा सूचना यावेळी महापालिका आयुक्त यांनी दिल्या.तसेच ज्या ठिकाणी ड्रेनेजचे चोकअप झाले. Rain असेल त्याचेही काम ताबडतोब करून घेण्याचे सूचना आयुक्तांनी दिल्या. शहरातील ज्या नागरिकांना तक्रार करायचा असेल त्यांनी परिवर्तन ॲप च्या माध्यमातून फोटोसह तक्रार करावे. या तक्रारीचे विभागीय अधिकारी यांच्यामार्फत काम करून घेण्याचे प्रयत्न महापालिकेच्या वतीने करण्यात येईल. शहरातील नागरिकांना विनंती आहे की आपल्या भागात एक ते दोन वर्षांपूर्वी रोडचे काम झाले असेल ते जुने मक्तेदार यांच्याकडून करून घेण्यात येणार आहे. तसेच सोलापूर शहरात स्मार्ट सिटी चे रोडचे ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत ते देखील स्मार्ट सिटीच्या मक्तेदार यांच्या माध्यमातून बुजवण्यात येईल. अशी माहिती महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिली.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
****अधिक माहितीसाठी संपर्क ***
सुनिल कोडगी, संपादक
9503221143 / 9404151143