Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन
हे वाचा – पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत ऑनलाईन पोर्टल सुरू
दुसरीकडे, सध्या तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी परिसरात सध्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील एक-दोन दिवसांत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 11 नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. संबंधित परिसरात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याचा काहीअंशी परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार आहे. महाराष्ट्रातील कोकण, घाट परिसर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने शनिवारी (13 नोव्हेंबर) आणि रविवारी (14 नोव्हेंबर) पुण्यासह एकूण 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी राज्यात पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळणार आहेत. या जिल्ह्यांत वेगवान वारे वाहणार असून या वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असणार आहे. रविवारी देखील राज्यात हीच परिस्थिती कायम राहणार असून याच अकरा जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. शनिवार आणि रविवार दोन्ही दिवशी पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सुट्टीनिमित्त फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्या पुणेकरांनी लांबचा प्रवास टाळावा, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143
#solapurcitynews