0Rajesh 20Kale 0
Crime

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळेंवर खंडणीचा गुन्हा दाखल

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापूर महानगरपालिकेत सत्ता असलेल्या भाजपच्या उपमहापौर राजेश काळेवर पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. उपमहापौर मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनाही फोन करून शिवीगाळ केली आणि उपायुक्त धनराज पांडे यांना ५ लाखाची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. धनराज पांडे यांच्या उपायुक्तांची नियुक्ती नियमबाह्य असून, ‘तुमची बदली थांबवायची असेल तर मला पाच लाख रुपये द्या. अन्यथा मी मागासवर्गीय समाजाचा असून तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करेन’ अशा पद्धतीची धमकी देत खंडणीची मागणी भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांनी केली असल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी नियमबाह्य पद्धतीने काम करण्यास सांगितले असताना ते काम न झाल्याने फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असा आरोप महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी केला आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर व उपायुक्तांना शिवीगाळ करून उपायुक्तांना 5 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपाचे उपमहापौर राजेश काळे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला असून राजेश काळे यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
                             या प्रकरणी महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, एका सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या परिसरात ई-टॉयलेट, कचरापेट्या व इतर साहित्यांची व्यवस्था करावी. यासाठी भाजपचे उपमहापौर राजेश काळे हे झोन अधिकार्‍यांना फोन करून शिवीगाळ करीत होते. प्रशासनाच्या मान्यतेशिवाय पालिकेची मालमत्ता कुठेही नियमबाह्य पध्दतीने नेता येणार नाही. तुम्ही शासकीय नियमानुसार यापूर्वीच पत्रव्यवहार करणे गरजेचे होते. असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. यावरून संतापलेल्या उपमहापौर राजेश काळे यांनी रविवारी उपआयुक्त धनराज पांडे, झोन अधिकारी नीलकंठ मठपती यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर काळे यांनी मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनाही फोन करून शिवीगाळ केली आणि उपायुक्त धनराज पांडे यांना ५ लाखाची खंडणी मागितली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून भारतीय जनता पक्षाचे उपमहापौर राजेश काळे यांच्याविरूध्द अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, खंडणी मागणे, अन्वये भादंवि कलम 343, 385, 504, 506, 294 प्रमाणे सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपमहापौर राजेश काळे यांच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती या गुन्ह्याचा तपास करणारे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com